बेताल वकतव्य करणाऱ्या मांजलगाव येथील डी वाय एस पी भाग्यश्री नवटक्के यांना बंडतर्फ करण्याची मागणी.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२: मांजलगाव येथील डीवायएसपी भाग्यश्री नवटक्के या महिला अधिकाऱ्याने केलेल्या बेताल वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वञ व्हायरल होत आसुन याचा गांभीर्याने विचार करून या महिला अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून कर्ततव्यात कसूर केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात यावे या मागणीचे निवेदन दिनांक ०१ डिसेंबर रोजी मानवत येथील समस्त फुले-शाहू-आंबेडकर वादि नागरिकांच्या वतीने तहसीलदार मानवत मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ,सदरील महिला पोलीस अधिकाऱ्याने दलितांना हातपाय बांधून मारते आणि आजपर्यत २१ दलितांना फोडून काढले आहे व ऍट्रॉसिटीचा राग काढते आणि खोट्या केसमध्ये दलितांना अडकविते तसेच सवर्ण समाजाची बाजू घेऊन गोरगरीब जनतेस वेठीस धरते असे बेताल वक्तव्य महिला पोलीस अधिकाऱ्यांनी करणे म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम या महिला अधिकारी करीत आहेत अशा पद्धतीने आपल्या पदाचा गैरवापर करून दलित समाजातील लोकांवर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत अन्याय अत्याचार होत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे दाद मागायची सदरील बेताल वक्तव्य व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे या महिला पोलीस अधिकार्याने दलितांवरील तपासणी केलेल्या सर्व गुन्हे ची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर बंडतर्फ करण्यात यावे तसेच ज्या २१ दलितांना या महिला पोलीस अधिकाऱ्याने फोडून काढले आहेत तसेच त्यांच्यावर अन्याय केलेला आहे व खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे त्वरित परत घेण्यात येऊन झालेल्या त्रास पोटी त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनात दिला आहे निवेदनावर ॲड.मिलिंद तुपसमुद्रे ,कार्तिक मजमुने, आनंद पंचांगे, सागर गाडे, अमोल मगर, किरण पंडित, विनोद लोखंडे ,सावन जोंधळे, विजय धबडगे, गौतम जमदाडे अयुब भाई, आशिष घुगे, शुभम पंचांगे, विकी नवरे आदिच्या स्वाक्षरी आहेत.
Sunday, December 2, 2018
बेताल वकतव्य करणाऱ्या मांजलगाव येथील डी वाय एस पी भाग्यश्री नवटक्के यांना बंडतर्फ करण्याची मागणी.
Subscribe to:
Posts (Atom)