Wednesday, June 10, 2020

फेसबुकच्या माध्यमातून जातीवाचक पोस्ट करणाऱ्या समाजकंटकावर कायदेशिर कारवाई करण्याची मानवत रिपब्लीकन सेनाची मागणी.

फेसबुकच्या माध्यमातून  जातीवाचक पोस्ट करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्याची  मानवत रिपब्लीकन सेनाची  मागणी.

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.१०:फेसबुकवर जातीवाचक अश्लील पोस्ट प्रसारीत केल्याबद्दल समाजकंटकास अटक करुन कायदेशिर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन सेना शाखा मानवतच्या वतीने तहसिलदार साहेब मानवत यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब व मा.गृहमंत्री साहेब यांना दि.१० जुन रोजी निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.
निवेदनात नमुद केले आहे की,प्रफुल्ल संजय साळवे या समाजकंटकाने फेसबुकच्या माध्यमातून दोन दिवसापुर्वी मो.नं. ९११२१२१०९५ या क्रंमाकावरुन जातीवादी पोस्ट प्रसारीत केली असुन त्यामध्ये बौध्द समाजाच्या स्ञीयाविषयी अश्लील भाषेत टिका केली आहे सदर ईसम हिगोली येथील रहिवासी आहे त्याच्या फेसबुक अकाऊट वरुन दिसत आहे या प्रकरणातील सदरील समाजकंटकास लवकरात लवकर अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आले यावा अन्यथा लोकशाहि मार्गाने रिपब्लीकन सेना मानवतच्या वतीने तिव्र निषेध करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष दिपक ठेंगे ,युवा ता.अध्यक्ष रवीभाऊ पंडित , युवानेते नागसेन भदर्गे ,मिलिंद तुपसमुद्रे,विजय खरात ,किरण पंडीत,बाबा ढवळे,शुंभम पचागें आदी उपस्थीत होते.

Wednesday, June 3, 2020

मानवत तालुक्यातील कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल इंग्रजी शाळेच्या प्राचार्यपदी डॉ. बिंदू श्रीवास्तव यांची नियुक्ती.

कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल  इंग्रजी शाळेच्या प्राचार्यपदी डॉ. बिंदू श्रीवास्तव यांची  नियुक्ती


मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.३: मानवत तालुक्यातील कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली या इंग्रजी शाळेत डॉ. बिंदू श्रीवास्तव यांची प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती भावनाताई बोर्डीकर यांनी दिली आहे.
भावनाताई बोर्डीकर संचालित ब्रह्मा व्हॅली आयसीएसई ही  इंग्रजी माध्यमातील शाळा मानवत तालुक्यातील कोल्हा येथे मागील दोन वर्षापासून यशस्वीपणे कार्यरत असून शैक्षणिक वर्ष २०२० ते २१ या वर्षी ब्रह्मा व्हॅली आयसीएसई या इंग्रजी शाळेचे  ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल स्कूल असे नामकरण करण्यात आले असल्याची माहिती भावनाताई बोर्डीकर यांनी दिली आहे तसेच या शैक्षणिक वर्षापासून डॉ. बिंदू श्रीवास्तव या ऊच्य विद्या विभूषित असुन त्यांनी  एम.ए. बी.एड. एम.एड. पी‌.एच.डी. चे शिक्षक पुर्ण झाले असून त्यांची कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी शाळेत प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली असून तसेच यावर्षी या  पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बरोबर संलग्नता केली आहे आणि  त्यांचा अभ्यासक्रम अवलबविण्यात येणार आहे तसेच सीबीएसई  बोर्ड सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली असून
सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी ब्रह्मा व्हॅली  इंटरनॅशनल स्कुल या इंग्रजी शाळेत संपर्क करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे अहवान भावनाताई बोर्डीकर यांनी केले आहे.

Tuesday, June 2, 2020

आमदार बाबाजानी दुर्राणीसह मुस्लीम बांधवावरील गुन्हे मागे घेण्याची समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांची मागणी.

आ.बाबाजानी दुर्राणीसह मुस्लीम बांधवावरील गुन्हे मागे घेण्याची समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांची मागणी.

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि,२: पाथरी येथे सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी  यांच्यासह १२५ जणांवर पाथरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे  प्रशासनाने केलेल्या या  कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक नाराजी  व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवर पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे या मागणीचे निवेदन समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांच्यावतीने दि. २ जुन  रोजी मानवत तहसिलदार डि डि फुफाटे यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, पाथरी येथे सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी ,तरबेज खान,तारेख खान यांच्यासह १२५ मुस्लीम बांधवावर   पाथरी पोलीस स्टेशन येथे सामुहिक रित्या नमाज पठण केल्या बद्दल  तसेच संचारबंदि  जमाव बंदि आदेशाचे उल्लंघन केल्या बद्दल  गुन्हा दाखल झाला आहे हे दुर्दैवी असुन आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पुर्ण लॉकडाऊन च्या काळात गोरगरीबांना मोठ्याप्रमाणात मदत केली असुन त्यांनी केलेल्या  वेळोवेळी आवाहानामुळे पाथरी शहरासह तालुक्यातील नागरीकांनी लॉकडाऊन चे कठोर पालन केले आहे तसेच ईदची नमाज पठण करताना त्यांनी शारीरिक अंतराचे महत्वपुर्ण पालन केले आहे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक नाराजी  व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ मुस्लीम बांधवावरील  पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे असे नमुद केले आहे.यावेळी दशरथ शिंदे पाटिल ,युवानेते आसद खान , शेख ईसाक भाई आदी उपस्थीत होते.