Wednesday, July 29, 2020

मानवत येथील खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेचे घवघवीत यश. [] निशात पाकिजा ९०% घेऊन ऊर्दु माध्यमातून तालुक्यातुन प्रथम []

मानवत येथील खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेचे घवघवीत यश.
[] निशात पाकिजा याने ९०% घेऊन ऊर्दु माध्यमातून तालुक्यातुन प्रथम []
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२९: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा  इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकाल आज दि.२९ जुलैरोजी बुधवारी जाहीर झाला  आहे यात 
मानवत येथील भारत रत्न खान अब्दुल गफ्फार खान उर्दू  विद्यालयातुन तसेच मानवत तालुक्यातुन उर्दू माध्यमातून प्रथम येण्याचा मान सय्यद निशात पाकिजा सय्यद मुस्तखीम या विद्यार्थिनी ने ९०%  मार्क घेऊन मिळविला आहे तसेच मो.साद बारी कुरेशी याने ८१% द्वितीय ,सानीया शेख रफिक ७८%, सायमा अ. रशीद कुरेशी ७८% तृत्तीय , शगुफ्ता खानम असद खान यांनी चतुर्थ क्रमांक पटकविला आहे. या यशाबद्दल भारत रत्न खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेचे अध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी साहेब, सचीव तारेख दुर्राणी साहेब  ,मुख्यध्यापक शेख मुखतार सर, मुस्ताक सर,रहमान सर,जुबेर सर,जावेद सर, मुजीब सर,मोईन सर,सिद्दिकि सर, ईनामदार सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.