मानवत डॉक्टर्स संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.अंकुश लाड यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत तालुका डॉक्टर्स संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ. अंकुश लाड, कार्याध्यक्षपदी डॉ. सचिन कदम तर सचिवपदी डॉ. सुशील नाकोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष डॉ. योगेश तोडकरी उपस्थित होते . याप्रसंगी सन २०२२ ते २०२५ या तिन वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली . या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष पदी डॉ सचिन चिद्रवार, डॉ रामकिशन इक्कर, सहसचिव डॉ नामदेव हेंडगे, डॉ अक्षय खडसे, कोषाध्यक्ष डॉ विजय कहेकर, सहकोषाध्यक्ष डॉ भारत कदम , सीएमइ कमिटी प्रमुख डॉ राजकुमार लड्डा, डॉ स्वप्नील वट्टमवार, डॉ निनाद दगडू, डॉ विठ्ठल काळे यांची तर सल्लागारपदी जेष्ठ व्यावसायिक डॉ डी बी लड्डा, डॉ एन बी दगडू, डॉ एस एल ढमढेरे, डॉ आनंद कत्रूवार यांची निवड करण्यात आली .
महिला प्रतिनिधी म्हणून डॉ शरयू खेकाळे, डॉ मनीषा गुजराथी, डॉ वर्षा वाघमारे यांची निवड करण्यात आली .
बैठकीस डॉ संतोष खडसे, डॉ विनोद सोमाणी, डॉ दिलीप जाधव, डॉ शशांक खेकाळे, डॉ सुरेश भिसे, डॉ राजेश लाटकर, डॉ श्याम वाघमारे, डॉ लहुकुमार सोळंके, डॉ नामदेव लेंगुळे, डॉ राजीव जाधव, डॉ रतन चामलवार
, डॉ हर्षद बाकळे, डॉ तन्मय कोक्कर , डॉ तुषार कोक्कर, डॉ अक्षय सोमाणी आदी जण उपस्थित होते .या वेळी बोलताना डॉकटरांसाठी वैद्यकीय भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार विविध कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ अंकुश लाड यांनी दिली .