सेलु येथील शेख जिशान याचा पहिला रोजा
सेलु / प्रतिनीधी
सेलु येथील राजगल्ली परीसरातील रहिवासी शेख जिशान शेख मुखीद वय ०८ वर्ष यांनी आपल्या आयुष्यातील पहिला (उपवास )रोजा पुर्ण केल्याबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.
मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरु असुन त्यात ऊन्हामुळे तीव्रतेमुळे चांगलाच कस लागत आहे परंतु इस्लाम धर्माच्या पाच कर्तव्य मधील उपवास रोजा हा एक प्रमुख कर्तव्य मानला जातो त्यामुळे उष्णतेच्या तीव्रतेचा काहीही विचार न करता उपवास धरणारे अल्लाच्या श्रद्धे साठी उपवास रोजा ठेवतात यात लहान मुलेहि आपल्या आयुष्यांचा पहिला रोजा ठेवतात याचीच प्रचिती म्हणुन आपल्या वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी शेख जिशान शेख मुखीद बेलदार यांनी आपल्या जीवनातला पहिला रोजा ठेवला जवळपास उपवास हा १४ तासाचा असून उपवासात पाणी पिणे सुद्धा जमत नसते सध्या उन्हाचा पारा चढला असतानासुध्दा शेख जिशान शेख मुखीद बेलदार यांनी उपवास ठेवल्यामुळे त्यांचे आई,आजी ,वडिल शेख मुखीद बेलदार , चुलते शेख मैनु बेलदार ,शेख मोसीन बेलदार ,हाजी शेख सखाऊद्दिन , मुस्तखीम बेलदार ,एकबाल राज ,अखील राज,मोबीन बेलदार ,शकिल राज ,समीर राज ,नवीद राज यांच्यासह राजगल्ली परीसरातील नागरिक या चिमुकल्याचे कौतुक करीत शुभेच्छा देत आहे.