परभणी येथे राज बेलदार समाजसेवा मंडळाच्या वतीने बैठकिचे आयोजन
मुस्तखीम बेलदार /प्रतिनीधी
राज बेलदार समाजसेवा मंडळाचे मुख्य कार्यालय तुराब्बुल हक्क नगर दर्गा रोड परभणी येथे राज बेलदार समाजाच्या वतीने बैठकी चे आयोजन दि.२५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले आहे.
राज बेलदार समाजाच्या सन्माननीय प्रतिनिधी जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचित करण्यात येते की सदरील बैठकीस बेलदार समाजाचे प्रेरणास्थान आदरणीय आमदार श्री .सुरेश रावजी वरपूडकर साहेब व शहर काँग्रेस अध्यक्ष नदीम इनामदार साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत पुढे होऊ घातलेल्या परभणी शहर महानगरपालिकेच्या व तसेच जिल्ह्यातील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राज बेलदार समाजाला संख्याच्या मानाने प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी सदर बैठकीमध्ये सांगोपांग चर्चा होणार आहे सदर बैठकीस पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम मानवत सेलू पूर्णा औरंगाबाद पैठण जालना बीड परळी अंबाजोगाई हिंगोली वाशिम वसमत मंठा आष्टी तसेच परभणी शहरातील राज बेलदार समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत सदरील बैठकीस उपस्थित राहून आपल्या समाजाच्या कार्यकर्त्यांना परभणी महानगरपालिकेच्या व जिल्ह्यातील नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधी मिळविण्यासाठी सदर बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे सदर बैठकीस राज बेलदार समाजाचे नेते मा.सय्यद नोमान हुसैनी कौसर साहेब राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाही व राज बेलदार समाजाचे प्रवक्ते माननीय बळीराम अरगडे युवानेते अब्दुल्ला राज साजिद साहब शेख खलील बेलदार शेख रईस महाराष्ट्र संघटक मुस्तखीम बेलदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
तरी राज बेलदार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज बेलदार समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष सय्यद निसार सय्यद ईलाहि यांच्यावतीने प्रसिद्धी पञिकेद्वारे करण्यात आले आहे.