मानवत पोलीस निरीक्षकपदी संदिप बोरकर रुजू
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शहरांमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून दीपक दंतुलवार हे कार्य करत होते
परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्रसिंग परदेशी यांच्या आदेशाने त्यांची बदली करण्यात आली असुन
मानवत येथे जिल्हा विशेष शाखा परभणी व सोनपेठ पोलीस स्टेशन इन्चार्ज अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा यामध्ये पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी कार्य केले होते दिनांक२५ मे रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर हे मानवत येथे रुजू झाले आहेत त्यांनी मानवत पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला आहे.अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि नियमाला धरून त्यांनी कित्येक अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य राहील. गुन्हेगारीवृत्तीला आळा घालून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी बोलताना दिली आहे पोलीस निरीक्षक संदीप बोरकर हे मानवत पोलीस स्टेशनला रुजू झाल्याची माहिती मिळताच मानवत येथील धर्मगुरू मौलाना सलीम, हाफेज जावेद बागवान, समाजसेवक शेख मुस्ताक पत्रकार इरफान बागवान त्याचबरोबर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडून त्यांचा सत्कार होत आहे.