मुस्लीम मुलीच्या लग्नासाठी जन्मभूमी फाऊंडेशनची आर्थीक मदत.
मानवत/मुस्तखीम बेलदार
दि.२८: जन्मभूमी फाऊंडेशनच्या वतिने शहरातील गरीब गरजू मुस्लिम मुलीच्या लग्ना साठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते मुलीच्या आईस रविवार २८ ऑक्टोबर रोजी मदत करण्यात आली.
मानवत शहरातील साने गुरूजी वाचनालय परिसरात राहाणा-या बेगम मुखरमखा बानो यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले आहे तर बेगम मुखरमखा बानो यांचे -हदयाचे बायपास झाल्याने मोठे अर्थीक संकट उभे राहीले होते. यातच वयात अलेल्या मुलीचे लग्न जमलेले असल्याने हा परिवार मोठ्या अर्थिक संकटात सापडला होता. घरात कर्ता पुरूष नसल्याने मुलीचे चार दिवसावर आलेले लग्न कसे करावे ही चिंता त्यांना सतावत होती. मलीचे लग्न चार नोहेंबर रोजी असल्याने या विषयीची माहिती जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात देण्यात आली. रविवार २८ ऑक्टोबर रोजी जन्मभूमी फाऊंडेशनचे सचिव किरण घुंबरे पाटील यांनी १० हजाराच्या अर्थिक मदतीचा चेक घेऊन मानवत येथील युवा नेते डॉ अंकूश लाड, पत्रकार लालाजी बाराहाते, गोपाल लाड, शामराव झाडगांवकर, विस्तार अधिकारी संदिपान घुंबरे, लक्ष्मणराव साखरे, शरदराव उगले, माजी नगराध्यक्ष मोहन लाड ,बाबूभाई झरीवाले, किरण घुंबरे पाटील यांच्या हस्ते बेगम मुखरूमखा बानो यांना ही मदत देण्यात आली. या वेळी या परिवाराने साश्रु नयनांनी जन्मभूमी फाऊंडेशन परिवाराचे आभार मानले.