शाळेसाठी एकहजार पुस्तके देणार-आ.मोहन फड.
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत तालुक्यातील ताडबोरगांव येथे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मोहन भाऊ फड यांनी भेट देऊन देवी दर्शन केले व मारोती मंदिर येथे जाउन दर्शन घेतले आणि यावेळी गावकरीशी बैठक घेऊन चर्चा केली . ग्राम पंचायत सदस्य मंचकराव जोगदंड यांनी आमदार मोहन भाऊ यांचा यावेळी सत्कार केला. पाणी आणि पांदन रस्ता काम या बाबत चर्चा केली गावकरी मंडळीनी अनेक प्रश्न केले आमदार मोहन भाऊ फड यांनी मार्गदर्शन केले आणि जिल्हा परिषद शाळा व जिल्हा परिषद नवीन वाचनालयात भेट दिली व आईधन वाचनालयसाठी एक हजार पुस्तके मुलाना देणार असल्याचे मार्गदर्शन करताना आ.फड यावेळी म्हणाले . शाळेत विद्यार्थ्यांनी आमदार मोहन भाऊ फड यांचे जग्गी स्वागत केले शाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी यावेळी केली.यावेळी राजु जोगदंड, विठ्ठल गुगाने, शेख रियाज, विलास जंगले, खदीरखान ,रंगनाथ निर्वळ, गोहीद अवचार आदी उपस्थीत होते .
Monday, October 22, 2018
बोरगाव येथील शाळेसाठी एकहजार पुस्तके देणार-आमदार मोहनभाऊ फड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment