Tuesday, May 11, 2021

मानवत येथील मुनज्जा शारमिन व मोहम्मद हसीब यांचा पहिला रोजा


मानवत येथील मुनज्जा शारमिन व  मोहम्मद हसीब यांचा पहिला रोजा
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत शहरातील गालीब नगर येथील रहिवासी मुनज्जा शारमिन मोहम्मद अनीस राज वय ५ वर्ष व मोहम्मद हसीब मोहम्मद अनीस राज वय ९ वर्ष 
या दोन्ही बहिण भावानी  पविञ रमजान महिण्याचे औचित्य साधुन १० मे रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास )पुर्ण केला आहे.रमजान महिण्याच्या रोजाला मुस्लीम बांधवामध्ये अनन्यसाधारण महत्व असुन या महिण्यात मुस्लीम बांधव सलग महिणाभर रोजा ठेवुन विविध धार्मिक कार्य पार पाडतात व अल्लाहची आराधना करतात आणी याच महिण्यात लहान मुले हि आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात याचीच प्रचिती म्हणुन मुनज्जा शारमिन मोहम्मद अनीस राज  व मोहम्मद हसीब मोहम्मद अनीस राज
या चिमुकल्याने   तपत्या उन्हाची पर्वा न करता आपल्या आयुष्यांचा  पहिला रोजा यशस्वीपणे पुर्ण केल्या बद्दल मुलांचे वडिल   मोहंमद अनिस मोहंमद खाजा राज, चुलते मोहंमद युनूस मोहंमद खाजा सर,मोहंमद मोईज मोहंमद खाजा सर ,ईम्रान गफ्फार राज आदीनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

Saturday, May 8, 2021

औरंगाबाद येथील कार्यदक्ष सरकारी कामगार अधिकारी रोहन रुमाले यांची आस्थापनावर धडक कारवाई

औरंगाबाद सरकारी कामगार अधिकारी  रोहन रुमाले यांची आस्थापनावर धडक कारवाई
औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार 

कामगार उपायुक्त कार्यालय औरंगाबाद व महानगरपालिका औरंगाबाद यांच्या समन्वयाने १९ आस्थापना ज्यांच्या विरुद्ध क्रांती चौक व सिटी चौक पोलीस ठाणेत गुन्हा दाखल झाला आहे त्या आस्थापना सील करण्यात आले आहेत त्यात होनेस्टि,करिष्मा शॉप,सबा कलेकशन,गुलशन क्लाँथ,भारत वाँच, आर के कलेकशन,चांडक किराणा,अभय ट्रेडर्स,रतनलाल मोतीलाल,पंजाब शुटींग शर्टिग,फेमस ट्रेडर्स,युनूस टी,रुक्मिणी साडी सेंटर,मनोकामना क्लाथ सेन्टर,सत्त्या इलेक्ट्रॉनिक
,गुड लक फ्लॉवर,लुकिंग बॉईज कापड दुकान
व लक्की प्लांटस अँड फ्लोरिस्ट या आस्थापना आहे.
सदर पथकात कामगार उपायुक्त कार्यालयातील कार्यदक्ष  सरकारी कामगार अधिकारी श्री .रोहन रुमाले, श्री. अमोल जाधव,सुविधकार तथा दुकाने निरीक्षक श्री गोविंद गावंडे विठ्ठल बैद्य व महेंद्र अंकुश हे हजर होते.