वाढत्या डिझेल पेट्रोल दरा विरुध्द मानवत
एम आय एम पक्षाच्या वतीने निवेदन
मानवत / मुस्तखीम बेलदार
देशात व राज्यात वाढत्या डिझेल पेट्रोल दरा विरुध्द मानवत
एम आय एम पक्षाच्या वतीने दि.१८ जुनरोजी तहसिलदार मानवत मार्फत केद्रिय सचीव पेट्रोलीयम विभाग गोवरमेन्ट आँफ ईडिया न्यु दिल्ली व विक्रिकर विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की आजच्या परिस्थितीमध्ये अन्न वस्त्र व निवारा याच प्रमाणे पेट्रोल व डिझेल आवश्यक झाली आहे माहितीप्रमाणे केंद्रशासन तरी ३० रुपये प्रति लिटर पेट्रोल ३२ रुपये प्रति लिटर डिझेल आकारत आहे तसेच राज्य सरकार वँटच्या नावावर २५ टक्के प्रति लिटर पेट्रोल २२ टक्के डिझेलवर आकारित आहे ही वस्तुस्थिती १५ मार्च २०१९ चा डाटा प्रमाणे आहेत परंतु पेट्रोल व डिझेलवर संपूर्ण भारतात सर्वसामान्य जनतेची लूट केली जात आहे त्यामुळे मा.साहेबानी केंद्र शासन व राज्य शासन यांनी आपले टॅक्स कमी करून सध्या करण्यात आलेल्या किमतीमध्ये २५ टक्के घट कपात केली पाहिजे हे आमच्या पक्षाची मागणी करत आहोत अन्यथा लोकशाही मार्गाने लढा देऊन तहसील कार्यालय समोर एम आय एम पक्ष तर्फे धरणे आंदोलन करण्यात येईल असे नमूद केले आहे. या वेळी एम आय एम पक्षाचे तालुकाध्यक्ष सय्यद समीर,सय्यद सुल्तान,महेफुजूरहेमान सय्यद,मुजाहिद फारुखी, मुख्तार शेख,अयाज़ शेख,अज़ीम शेख,अरबाज़ शेख,समीर शेख,मोबिन राज,साहिल बेलदार,तल्हा खान,शादाब सय्यद,शाहेद बागवान,रहीम तंबोली आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.