मानवत येथील मुस्लीम युवकाच्या वतीने मुख्यमंत्रीना ५०० पोस्ट कार्डद्वारे आरक्षणाची मागणी.
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत येथे मुस्लिम आरक्षण संदर्भात सकल मुस्लिम युवक महाराष्ट्राच्या आव्हानाला प्रतिसाद देत दि.१७ जुनरोजी एक युवक एक पोस्ट कार्ड मोहीम अंतर्गत मानवत येथील मुस्लिम युवकांच्या वतीने मा.ऊध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ५०० पोस्ट कार्डद्वारे मागण्या करण्यात आल्या आहे यात मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा,मॉबलिंचिंग केलेल्या मोहसीन शेखला न्याय देण्यात यावा,मॉब लिंचिंग विरुद्ध कायदा तयार करावा,प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारण्यात यावे,बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर मुस्लिम मुला-मुलींना यूपीएससी,एमपीएससीसाठी संस्था स्थापन करण्यात यावी,मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करण्यात यावी,राज्यातील वक्फ जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावेत, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच बळकटीकरण करण्यात यावं,वक्फ संपत्तीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा आदी मागण्या पोस्टद्वारे निवेदनात नमुद करण्यात आल्या आहे यावेळी सय्यद समीर,महेबूब मंसूरी,वसीम कुरेशी,शेख वाजेद,इलीयास पठान,सय्यद सईद,पाशा पटेल,ख़य्युम बागवान,समीर खान,मुन्ना खान,अश्पाक कुरेशी,सुल्तान मंसूरी, वसीम खान,जावेद तंबोली आदी युवक उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment