Monday, November 27, 2023

सर्वोदय मित्र कार्यकर्ता संमेलनाचा समारोह युवानेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते संपन्न

सर्वोदय मित्र कार्यकर्ता  संमेलनाचा समारोह युवानेते  डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते संपन्न 

मानवत / मुस्तखीम बेलदार 

सर्वोदय मित्र कार्यकर्ते संमेलन दिनांक २६  नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२३ रोजी मानवत येथील नेहा मंगल कार्यालय येथील स्वातंत्र्य सैनिक डॉ.गंगाप्रसाद अग्रवाल सभागृह येथे  संपन्न झाले आहे.
  या संमेलनाचे स्थानिक संयोजन समिती मानवत  अध्यक्ष अँड सुरेश बारहाते , डॉ.श्रीराम जाधव माजी  सचिव सेवाग्राम आश्रम वर्धा ,श्री. रमेश दाणे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ मुंबई ,साहेबराव तायडे यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली दोन दिवसिय संम्मेलन   संपन्न झाले या संमेलनाचा समारोह युवानेते  डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते करण्यात आला.

सद्यस्थितीत देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर सर्वोदय मंडळाची भूमिका तसेच  गांधी - विनोबा विचार कार्यातील  व राजनीतीकडून लोकनीतीकडे विषयावर तसेच  गांधीजी समज गैरसमज या विषयावर उपस्थीत विचारवंतानी दोन दिवसीय वेगवेगळ्या चर्चा सत्रात मार्गदर्शन केले .साहेबरावतायडे अकोला यांनी भारत स्मृती समता शिल्प प्रदर्शन चे देखावा सादर केला .
या संमेलनाला देशभरातून पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यकर्ता सम्मेलनाची सागता राष्ट्रगीत गायन करुन करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधीतज्ञ सुरेश बारहाते, डॉ. श्रीराम जाधव, प्राचार्य अशोक चिंदूरवार, ज्ञानेश्वर मुंढे, बेबी वाईकर, विजया समदानी, प्रा. भगवान टेकाळे, प्रा. सईनाथ फुलवाडकर, प्राचार्य दिनानाथ फुलवाडकर, अँड.सतीश बारहाते, डॉ. राजकुमार लड्डा, डॉ. सुशील नाकोड, प्रा. उद्धव निर्वळ, उदय वाईकर, प्राचार्य राम फुण्णे, भाऊसाहेब होगे, रेणकोजी दहे आदींनी परिश्रम घेतले.

Wednesday, November 22, 2023

महाज्योती, सारथी, बार्टिच्या धर्तीवर मार्टिच्या स्थापनेसाठी मुस्लीम समाजाने चळवळ उभारावी - शेख महेमुद सर

महाज्योती, सारथी, बार्टिच्या धर्तीवर मार्टिच्या स्थापनेसाठी मुस्लीम समाजाने चळवळ उभारावी - शेख महेमुद सर

मानवत प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार 

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे दिनांक ७ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान होत आहे. या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र शासनाने महाज्योती, सार्थि, बार्टिच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्टिची ( मौलाना आझाद रिसर्च & ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ) या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी. या करीता मुस्लिम समाजातील उच्चशिक्षित युवकांसह मुस्लीम समाज बांधवांनी आप आपल्या मतदारसंघातील खासदार, आमदार सहित विविध पक्षांचे नेते यांच्याकडे सदरील मागणी लावून धरावी. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदने पाठवावी व चळवळ चालवावी असे आव्हान सेलु येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत शेख महेमुद सर यांनी केले आहे. 
    मार्टिची स्थापना झाल्यास या स्वायत्त संस्थेमार्फत शैक्षणिक मार्गदर्शन तसेच विविध शिष्यवृत्ती मिळाल्यास मुस्लिम समाजाचा शैक्षणिक विकास साध्य होण्यास नक्कीच मदत होऊ शकेल.

महाज्योती, सारथी, बार्टिच्या धर्तीवर मार्टिच्या स्थापनेसाठी मुस्लीम समाजाने चळवळ उभारावी - शेख महेमुद सर मानवत प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे दिनांक ७ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान होत आहे. या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र शासनाने महाज्योती, सार्थि, बार्टिच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्टिची ( मौलाना आझा


Thursday, November 9, 2023

डॉ.अंकुश लाड याच्यां प्रयत्नामुळे २५ वर्षापासून चा प्रलंबित पाणी प्रश्न मिटला

 युवानेते डॉ.अंकुश लाड याच्यां प्रयत्नामुळे २५ वर्षापासून चा प्रलंबित पाणी प्रश्न मिटला

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन द्वारे संपूर्ण शहरात पाणी उच्च दाबाने पुरवठा होत होता परंतु जुने मानवत असलेल्या काही परिसरात मात्र उच्च दाबाने पाणी मिळत नसल्याने गेल्या २५ वर्षापासून त्या ठिकाणच्या नागरिकांचा पाणी प्रश्न गंभीर बनला होता मानवत नगरपालिकेचे युवा नेते डॉ.अंकुश लाड यांनी या प्रश्नाकडे लक्ष देत तात्काळ हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन त्याचे काम पूर्णत्वाकडे नेले असून आता २५ वर्षापासून चा प्रलंबित पाणी प्रश्न कायमचा सुटला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, मानवत शहरात जुने मानवत म्हणून ओळख असलेले विठ्ठल मंदिर परिसर, चंदनेश्वर गल्ली ,खंडोबा टेकडी परिसर ,जुने दत्त मंदिर परिसर ,कडतन गल्ली परिसर ,बिडी कारखाना परिसर ,माळी गल्ली परिसर ,झारे गल्ली परिसर ,बौद्ध नगर ,सिद्धेश्वर नगर, चौमठ विहीर परिसर ,आदिशक्ती चौक या सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा उच्च दाबाने होत नसल्याने या ठिकाणच्या नागरिकांना गंभीर पाणी समस्येचा सामना करावा लागत होता या ठिकाणच्या नागरिकांनी गेल्या पंचवीस वर्षापासून नगरपालिकेकडे गाऱ्हाणे मांडत पाणी प्रश्न सोडवावा यासाठी निवेदने , आंदोलने केले होते परंतु या ठिकाणचा प्रश्न सोडवायचा जरी म्हटला तरी तो साधारणपणे सोडवता येत नव्हता कारण हा संपूर्ण परिसर भौगोलिक दृष्ट्या चढ असलेल्या भागात असल्याकारणाने पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन त्या ठिकाणी उच्च दाबाने पाणीपुरवठा करू शकत नव्हत्या याचा मार्ग काढणे अत्यंत किचकट होते परंतु  युवा नेते डॉ. अंकुश लाड यांनी या प्रकरणाचा मार्ग काढायचाच असे ठरवल्याने त्यांनी मुख्याधिकारी कोमल सावरे , अभियंता सय्यद अन्वर व पाणीपुरवठा अभियंता विनय आडसकर यांच्यासोबत बैठक घेऊन हा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा केली आणि चर्चांती सध्या मानवत शहरात जी नवीन पाईपलाईन टाकली आहे त्या पाईपलाईन ला आणखी एक समांतर पाईपलाईन जोडून जर या परिसरात नवीन पाईपलाईन टाकली तर हा पाणी प्रश्न बऱ्यापैकी मिटू शकतो असे या चर्चेतून निघाल्यानंतर तात्काळ या कामास सुरुवात झाली नुकत्याच झालेल्या नव्या पाईपलाईनला समांतर पाईपलाईन मुख्य रस्त्यावरील सांगली बँक समोर असलेल्या चौकातून खाली जुन्या मानवत कडे खोलपर्यंत नवीन खोदकाम करून टाकण्यात आली आणि या जुन्या मानवत परिसरातला लोकांचा पाणी प्रश्न कायमचा निकाली  लागला फार दिवसानंतर उच्च दाबाने पाणीपुरवठा होऊ लागल्याने या ठिकाणच्या लोकांनी सुटकेचा विश्वास  सोडला या परिसरातील लोकांनी युवा नेते डॉ. अंकुश लाड यांना बोलवुन  आभार मानुन त्यांचा सत्कार केला .

Wednesday, November 8, 2023

१४ नोव्हेंबर रोजी दिपावली पाडव्याच्या दिवशी लिलावाची कापूस खरेदी सुरू होणार - सभापती पंकजराव आंबेगावकर.

१४ नोव्हेंबर  रोजी दिपावली पाडव्याच्या दिवशी लिलावाची कापूस खरेदी सुरू होणार  - सभापती पंकजराव आंबेगावकर
मानवत / मुस्तखीम बेलदार 
कापुस हंगाम सन २०२३-२४ करीता मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतच्या सभागृहा मधे दि. ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी सभापती पंकजराव आंबेगावकर व कापूस खरेदीदार व्यापारी यांजी बैठक आयोजीत करण्यात आली  होती .
सदर बैठकीमधे बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डात दि. १४.११.२०२३ रोजी दिपावली पाडव्याच्या दिवशी लिलावाची कापूस खरेदी सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे.

या वेळी बाजार समितीचे सभापती श्री. पंकजराव जाधव आंबेगावकर, उपसभापती श्री. नारायणराव भिसे, श्री. जुगलकिशोरजी काबरा संचालक श्री.ज्ञानेश्वरराव मोरे, संचालक श्री रामेश्वरराव जाधव बाजार समितीचे सचिव श्री शिवनारायणजी सारडा उपस्थीत होते तर व्यापारी श्री युनुसभाई मिलनवाले, श्री विजयप्रकाश पोरवाल, श्री गिरीषसेठ कत्रुवार , श्री राहुल कडतन श्री परमेश्वर गोलाईत. श्री रामनिवास सारडा, श्री अमित पटेल, श्री. जलालभाई, श्री. सागर मुंदडा उपस्थीत होते. या वेळी बाजार समितीच्या वतीने शेतकन्यांना आवाहण करण्यात आले की, आपला कापुस दिनांक १४.०११.२०२३ पासुन लिलाव पद्धतीने विक्री करीता आनावा तसेच आपण विक्री केलेल्या कापसाचे पेमेंट २४ तासाचा आत घ्यावे पेमेंट २४ तासाचा आत न मिळाल्यास रितसर बाजार समितीकडे तक्रार ७ दिवसाचे आत करावी. ७ दिवासांनंतर पैसे न मिळाल्याची तक्रार बाजार समितीमार्फत स्विकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी कोणत्याही शेतकऱ्याने अनामत कापुस विक्री करू नये असे आवाहण या समिती मार्फत करण्यात आले आहे.