१४ नोव्हेंबर रोजी दिपावली पाडव्याच्या दिवशी लिलावाची कापूस खरेदी सुरू होणार - सभापती पंकजराव आंबेगावकर
मानवत / मुस्तखीम बेलदार
कापुस हंगाम सन २०२३-२४ करीता मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतच्या सभागृहा मधे दि. ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी सभापती पंकजराव आंबेगावकर व कापूस खरेदीदार व्यापारी यांजी बैठक आयोजीत करण्यात आली होती .
सदर बैठकीमधे बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डात दि. १४.११.२०२३ रोजी दिपावली पाडव्याच्या दिवशी लिलावाची कापूस खरेदी सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या वेळी बाजार समितीचे सभापती श्री. पंकजराव जाधव आंबेगावकर, उपसभापती श्री. नारायणराव भिसे, श्री. जुगलकिशोरजी काबरा संचालक श्री.ज्ञानेश्वरराव मोरे, संचालक श्री रामेश्वरराव जाधव बाजार समितीचे सचिव श्री शिवनारायणजी सारडा उपस्थीत होते तर व्यापारी श्री युनुसभाई मिलनवाले, श्री विजयप्रकाश पोरवाल, श्री गिरीषसेठ कत्रुवार , श्री राहुल कडतन श्री परमेश्वर गोलाईत. श्री रामनिवास सारडा, श्री अमित पटेल, श्री. जलालभाई, श्री. सागर मुंदडा उपस्थीत होते. या वेळी बाजार समितीच्या वतीने शेतकन्यांना आवाहण करण्यात आले की, आपला कापुस दिनांक १४.०११.२०२३ पासुन लिलाव पद्धतीने विक्री करीता आनावा तसेच आपण विक्री केलेल्या कापसाचे पेमेंट २४ तासाचा आत घ्यावे पेमेंट २४ तासाचा आत न मिळाल्यास रितसर बाजार समितीकडे तक्रार ७ दिवसाचे आत करावी. ७ दिवासांनंतर पैसे न मिळाल्याची तक्रार बाजार समितीमार्फत स्विकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी कोणत्याही शेतकऱ्याने अनामत कापुस विक्री करू नये असे आवाहण या समिती मार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment