Friday, June 28, 2024

जमात ए इस्लामी हिंद मानवतच्या वतीने १५ दिवसीय पर्यावरण अभियानाची सुरुवात

जमात ए इस्लामी हिंद मानवतच्या वतीने १५ दिवसीय पर्यावरण अभियानाची सुरुवात 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत येथे १५ दिवसीय पर्यावरण अभियान जमाते इस्लामी हिंद मानवत राबवत आहे. या अभियानाच्या निमित्ताने नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देणे आणि पर्यावरणीय समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे ह्या उद्देशाने नगर पालिका  मानवत सहकार्य करण्याचे निवेदन जमाते इस्लामी हिंद मानवतच्या वतीने कार्यदक्ष मुख्याधिकारी कोमल सावरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहर अभियंता सय्यद अन्वर सर उपस्थीत होते.
आदरणीय मुख्याधिकारी कोमल सावरे मॅडम यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले शहरातील  प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे  असे मत व्यक्त केले.
स्थानिक शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पर्यावरण शिक्षण कार्यक्रम आयोजित करणे सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, उद्याने आणि जलाशयांची स्वच्छता करण्यासाठी स्वयंसेवकांचे संघ तयार करणे.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नगर पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण करणे. कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्नवीनीकरणाबाबत जनजागृती करणे.
वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आदी मुद्यावर चर्चा करण्यात आली.
नगर पालिका मानवत ने  या अभियानाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून हा अभियान यशस्वी होईल आणि मानवतचे पर्यावरणीय आरोग्य सुधारेल.
या निवेदनावर जमात ए इस्लामी हिंद मानवत चे पदाधिकारी सलीम सर, नजात सर,हाफेज़ लतीफ, मौलाना असलम,शेख समीर, शेख मुश्ताक,स.सरफराज , सय्यद एकबाल राज, फय्याज अन्सारी यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.

Thursday, June 27, 2024

ज्ञानदीप सेवाभावी संस्थाच्या वतीने मानवत येथे १० वी नॉन सेमी साठी मोफत शिकवणी वर्ग सुरु.

ज्ञानदीप सेवाभावी संस्थाच्या वतीने मानवत येथे १० वी नॉन सेमी साठी मोफत शिकवणी वर्ग सुरु.
मानवत / मुस्तखीम बेलदार 
ज्ञानदीप सेवाभावी संस्था मंगरूळ ( बु )
अंतर्गत इयत्ता १० वी च्या होतकरू, गरजू विद्यार्थी यांच्या साठी सध्या ५० मुलांसाठी वर्ष भर गणित आणि इंग्रजी विषयाचे अध्यापन अगदी मोफत सुरू झाले आहे , या साठी  ज्ञानदीप सेवा भावी  संस्थेला मानवत येथील प्राचार्य मा.संतोष पवार सर हे रोज अडीच तास वेळ देत असून, सध्या याच मुलांची बाहेरील क्लास ची फीस ६ लाख रु अशी असून ती पूर्णपणे बचत  होत आहे , पवार सर हे मानवत शहरात गेली १२ वर्ष पासुन अध्यापन करत असून गेल्या वर्षी पासून मोफत क्लास चालवत आहेत , तसेच त्यांचे सहकारी प्राध्यापक कांबळे सर  जाधव सर यांचे आज पर्यंत ८० ते ८५ विद्यार्थी विविध खात्यात शासकीय नौकरीला लागले आहे ,   अभ्यासातील मागे असलेले विद्यार्थी यांच्या साठी सुद्धा स्वतंत्र मार्गदर्शन पवार सर करत आहेत , मोफत आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण विद्यार्थी यांना मिळत असल्याने अनेक विद्यार्थी तसेच पालक समाधानी आहे ,  याचा फायदा अनेक गरज वंत विद्यार्थी यांना होतांना दिसून येत आहे, त्यांच्या या कार्यास समाजातून भरघोस प्रतिसाद तसेच कौतुकाची छाप पडत आहे , खरोखर ज्ञानदानाचे कार्य हे असे आज मिळणे आवश्यक आहे ,  कारण कित्येक विद्यार्थी हे आज हजारो रु फीस भरू शकत नाही ,   तसेच वयोगट १४ ते २५  शाळा बाह्य विद्यार्थी यांच्या साठी चौथी नापास विद्यार्थी असेल  तरी पण १० वी ला बसण्याची संधी रामपुरी आणि पोहंडुळ या गावी शैक्षणिक उपक्रम सुरू आहे ,त्यांच्या या कार्यास त्यांचे इतर सहकारी  प्राध्यापक रासवे  , घाटुळ , पाटील सर सहकार्य करत आहेत, सदरील क्लास हे १५ एप्रिल पासून पोलीस स्टेशन च्या पाठीमागे राठीं निवास या ठिकाणी रोज अडीच तास  होत आहेत. 
पवार सर  यांच्या शी संपर्क साधला असता ते म्हणतात की पालकवर्ग तसेच  विद्यार्थी यांनी तसेच समाजातील लोकांनी सहकार्य केले तर असेच पुढच्या वर्षी किमान १५० ते २०० विद्यार्थी यांना नक्कीच मोफत मार्गदर्शन करून विद्यार्थी यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थी कसे चांगल्या पदावर जातील याची दक्षता घेऊ,  
यांच्या कार्यास ज्ञानदीप सेवा भावी  संस्था मार्गदर्शन करत आहे,  ज्ञानदिप सेवा भावी संस्था चे अध्यक्ष  शांतलींग काळे , राजेभाऊ डुकरे मार्गदर्शन करुन शिक्षकांचे अभिनंदन करत आहे.

Thursday, June 13, 2024

मनोज जरांगे पाटील यांच्यां मागण्या मान्य करण्याची मानवत सकल मराठा समाज बांधवाची मागणी.

 मनोज जरांगे पाटील यांच्यां मागण्या मान्य करण्याची मानवत सकल मराठा समाज बांधवाची मागणी
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले आहे त्यांच्या मागण्या तत्काळ मान्य करण्यात याव्या या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य मार्फत मा. तहसीलदार पांडुरंग माचेवाड साहेब मानवत यांना सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने दि.१३ जुनरोजी निवेदन देण्यात आले आहे.
 मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दि.०८/०६/२०२४ पासून मराठा आरक्षण संदर्भामध्ये अन्न त्याग उपोषणाला बसलेले आहेत. तरी आज ६ वा दिवस उपोषनेचा असून अद्यापही सरकार व त्यांची यंत्रणा उपोषण मागे घेण्य संदर्भामध्ये तसेच त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये अपयशी झालेला आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. जर येत्या दोन दिवसामध्ये सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात कुठलाही तोडगा न काढल्यास आणि मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्या संदर्भात निर्णय न घेतल्यास येत्या दोन दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच ह्या आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी हि शासनाची राहील असे दिलेल्या  निवेदनात नमुद केले आहे.