Friday, June 28, 2024

जमात ए इस्लामी हिंद मानवतच्या वतीने १५ दिवसीय पर्यावरण अभियानाची सुरुवात

जमात ए इस्लामी हिंद मानवतच्या वतीने १५ दिवसीय पर्यावरण अभियानाची सुरुवात 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत येथे १५ दिवसीय पर्यावरण अभियान जमाते इस्लामी हिंद मानवत राबवत आहे. या अभियानाच्या निमित्ताने नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देणे आणि पर्यावरणीय समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे ह्या उद्देशाने नगर पालिका  मानवत सहकार्य करण्याचे निवेदन जमाते इस्लामी हिंद मानवतच्या वतीने कार्यदक्ष मुख्याधिकारी कोमल सावरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहर अभियंता सय्यद अन्वर सर उपस्थीत होते.
आदरणीय मुख्याधिकारी कोमल सावरे मॅडम यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले शहरातील  प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे  असे मत व्यक्त केले.
स्थानिक शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पर्यावरण शिक्षण कार्यक्रम आयोजित करणे सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, उद्याने आणि जलाशयांची स्वच्छता करण्यासाठी स्वयंसेवकांचे संघ तयार करणे.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नगर पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण करणे. कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्नवीनीकरणाबाबत जनजागृती करणे.
वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आदी मुद्यावर चर्चा करण्यात आली.
नगर पालिका मानवत ने  या अभियानाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून हा अभियान यशस्वी होईल आणि मानवतचे पर्यावरणीय आरोग्य सुधारेल.
या निवेदनावर जमात ए इस्लामी हिंद मानवत चे पदाधिकारी सलीम सर, नजात सर,हाफेज़ लतीफ, मौलाना असलम,शेख समीर, शेख मुश्ताक,स.सरफराज , सय्यद एकबाल राज, फय्याज अन्सारी यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.

No comments:

Post a Comment