श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीच्या अध्यक्षपदी ओंकार वाघमारे यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
दिनांक २६ जानेवारी रविवार रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ व्या जयंतीनिमित्त जिजाऊ नगर मानवत येथे बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील सर मुख्य मार्गदर्शक नारायण पानझाडे, हे होते यावेळी समाज बांधवांच्या उपस्थितीत गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीची निवड करण्यात आली असून, जयंती समितीचे अध्यक्षपदी ओंकार माणिक वाघमारे, तर उपाध्यक्ष म्हणून शिवाजी दीपक ठोंबरे, सचिव राजेंद्र देविदास कांबळे, सहसचिव शिवाजी भगवान शिंदे, कोशाध्यक्ष ज्ञानेश्वर उत्तम पानझाडे, कार्याध्यक्ष परमेश्वर वाघमारे तर सल्लागार म्हणून प्रा.एस. एन. पाटील सर , मुरलीधर ठोंबरे, नारायण पानझाडे, हनुमान नांदुरे, मदनराव कांबळे, सुदामराव कांबळे व सदस्यपदी भागवत कांबळे, रमेश केंदळे, शिवप्रसाद कावळे, गणेश कांबळे, रामेश्वर पानझाडे, कृष्णा सावरे, घनश्याम कुरील, कमलाकर फुलपगार, यांची निवड करण्यात आली असून येणाऱ्या २३ फेब्रुवारी रविवार रोजी गुरु रविदास महाराज, राजे छत्रपती शिवाजी महाराज, व गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती साजरी करण्याचे निश्चित झाले आहे २३ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते बारा मध्यवर्ती बँक ते महाराणा प्रताप चौकातून गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार व या नंतर बारा ते तीन निमंत्रित मान्यवरांचे सत्कार व मनोगत चा कार्यक्रम संपन्न केला जाईल, व लागलीच कार्यक्रम स्थळी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे या बैठकीत ठरले आहे.
या वेळी अर्जुन ठोंबरे,संतोष कांबळे, ज्ञानोबा नेटक, रामेश्वर पानझाडे, विलास पानझाडे, गणेश पानझाडे, गणेश कांबळे, मारोती पवार,हरी ठोंबरे, शिवा पानझाडे, तुकाराम पानझाडे, दिनेश आधाटे, बालाजी पानझाडे, अशोक कांबळे, रमेश ठोंबरे यांच्या सह चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.