मनपा नारेगावच्या शाळेला जर्मनी येथील पाहुण्यांची भेट
औरंगाबाद /प्रतिनीधी
मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा नारेगाव येथे २२ जानेवारी रोजी केंद्रीय मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती संगीता ताजवे मॅडम आणि मुख्याध्यापक श्री अब्रार अहमद सर यांच्या उपस्थितीमध्ये आय एस पी एफ आणि सेमिंस अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रोजेक्ट जिज्ञासा ईन्टर स्कुल स्टिम फेअर अंतर्गत इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्याची विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते ही विज्ञान प्रदर्शनी दरवर्षी घेण्यात येते विशेष म्हणजे यावर्षी विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने संयोजकांनी इयत्ता सातवी ते दहावी मधून दोन भागात ही प्रदर्शनी घेण्याचे ठरविले व इयत्ता सातवी व आठवीचे विज्ञान प्रदर्शनी मध्ये इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. महत्वपूर्ण बाब म्हणजे या प्रदर्शनीसाठी जर्मनी येथून सिमेंस कंपनीचे फायनान्स लीडरशिप टीम ज्यामध्ये मिस्टर ऑर्बन वॉन फॅड्रिक सर , मिस्टर जिग्नेशाह सर आणि श्रीमती सौंदरम सुंदरम मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. विदेशी पाहुण्यांचा स्वागत लेझीमद्वारे व शाल पुष्पगुच्छ आणि विशेष भेटवस्तू देऊन करण्यात आले .
शाळेचे मुख्याध्यापक श्री सय्यद अबरार अहमद सर आणि श्री जुबेर सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोजेक्ट जिग्यासाचे
Iनम्रता सोनवणे मॅडम आणि स्टेम कोच श्री शरद गवई सर यासोबत शाळेच्या शिक्षक वृंद यांच्या सहभागाने आजचे विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.विदेशी पाहुण्यांनी नारेगावच्या स्मार्ट शाळेची बारकाईने पाहणी केली व शाळेची व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ..
संयोजकांकडून तीन विजेते आणि जर्मनी येथून आलेल्या पाहुण्यांतर्फे विशेष दोन पारितोषिक देण्यात आले यात प्रथम क्रमांक
सालिक परवेज जावेद इम्रान ३५००रु,
नवाज एजाज आणि यखीन अजीम३०००,
मोमीन इन्सरा इरफान२५०० रु तर विशेष पारितोषिक मध्ये शेख आलिया वसीम २०००रु व शेख साद शफिक २०००रुपयाचे पारीतोषीक विद्यार्थीना मिळाले आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment