Saturday, July 26, 2025

तुळजाभवानी बँके तर्फे नरळद जि.प. शाळेतील  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

तुळजाभवानी बँके तर्फे नरळद जि.प. शाळेतील  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
मानवत  /  मुस्तखीम बेलदार
मानवत तालुक्यातील मौ. नरळद येथील जिल्हा परिषद शाळेत २६ जुलै रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, माजलगाव यांच्या वतीने इयत्ता पहिलीच्या एकूण १९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत बँकेने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजा भवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे शाखा व्यवस्थापक श्री. निवृत्ती निर्वळ हे होते तसेच नरळद जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. चंदू जैस्वाल, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. अशोकराव तिथे युवा कार्यकर्ते रंजित (भैया ) तुपसमुंद्रे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्यंकट माने आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते शाळेचे मुख्यध्यापक श्री. व्यंकट माने यांनी तुळजाभवानी बँकेच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले या मुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागेल आणि त्यांच्या कुटुंबावरील आर्थिक भार ही कमी होण्यास मदत होईल बँकेने दिलेले हे सहकार्य विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे ठरेल असे असे मत यावेळी व्यक्त केले यावेळी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. निवृत्ती निर्वळ यांनी सांगितले कि बँक अशा उपक्रमासाठी नेहमीच प्रयत्नशील राहुन अशा सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल असे यावेळी सांगण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील पहिलीच्या १९ विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल अशा शालेय वस्तूंचा समावेश असलेली शैक्षणिक किट वाटप करण्यात आले किट वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. निवृत्ती निर्वळ, लिपिक गिरीश मगर, यांचा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. चंदू जैस्वाल श्री. अशोकराव तिथे युवा कार्यकर्ते रंजित (भैया ) तुपसमुंद्रे, मुख्याध्यापक श्री. व्यंकट माने यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षक श्री. बालासाहेब पाते, श्री. संतोष शिंदे, श्री. प्रविण कदम, श्री. अक्षय राऊत यांच्या सह शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment