सात सोबत निवासी अस्थी दिव्यांग विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत येथील साथ सोबत निवासी अस्थी दिव्यांग विद्यालयात रक्षाबंधनाचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपापसांत राखी बांधून भावंडांच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण साजरा केला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, आपुलकी आणि समाधानाचे भाव दिसत होते.
या प्रसंगी मुख्याध्यापक घोरी सरांनी विद्यार्थ्यांना भाऊ-बहिणीच्या नात्याचे महत्त्व, रक्षाबंधनाचा इतिहास व सणाचे सामाजिक, सांस्कृतिक मूल्य याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी भावंडांमधील प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांच्या रक्षणाची भावना नेहमी जपावी, असे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साजी सर, सोफिया मॅडम तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांनी मिळून कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केल्याने वातावरणात आनंद, आपुलकी आणि उत्साहाची लहर पसरली. विद्यार्थ्यांनीही सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे सणाचे महत्त्व व्यक्त केले आणि दिवस संस्मरणीय बनवला.