व्यक्तीमत्त्व विकास
आपण
कुणीही असाल, आपल्या प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण असेल तर
जगरहाटीतून आपले कुठेच काही अडत नाही. इच्छा तिथे मार्ग असतो. या मार्गावर
चालत राहणे मात्र मह्त्त्वाचे असते. म्हणूनच नकारात्मक भाव झटकत राहून
आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. आपला पोषाख,
दिसणे यापेक्षा आपल्याकडे कोणकोणती कौशल्ये आहेत, मराठी, हिंदी व इंग्रजी
भाषा कशी येते, व्यवहारज्ञान कितपत आहे, आपण निश्र्चित असे ध्येय निवडलेले
आहे किंवा नाही इत्यादी गोष्टींना आजच्या युगात मोठे मह्त्त्व आहे.
आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची सुरूवात ही
आईच्या कुशीतून होते आणि जगाच्या व्यासपीठापर्यंत विकासाच्या नवनव्या संधी
उपलब्ध होत असतात. त्या जितक्या समजून घेता येतील तेवढे आपण माणूस म्हणून
समृद्ध होत असतो. तेव्हा आरशात दिसणाऱ्या माणसासाठी विकासाच्या नेमक्या
वाटा शोधा. मरगळ झटका. आत्मविश्र्वासाने आपल्यात अनुकूल असे बदल करण्याची
सतत धडपड करा. स्थानिक पातळीपासून व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेक संस्था
आपल्यासाठी कार्यरत आहेत. आपल्या गरजेनुसार त्यांच्याकडून धडे घेण्यास
संकोच करू नका.
आपण कसे बोलावे? संवाद कसा साधावा, मुलाखत
कशी द्यावी, येथपासून ते समारंभात भाषण कसे करावे यापर्यंत, आवडीच्या
उद्योग-व्यवसायाची निवड कशी करावी, चांगली नोकरी मिळविण्यासाठी कोणते
प्रयत्न करावेत आणि हे साध्य करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण कुठे उपलब्ध
आहे, अशी व इतर अनेक प्रकारची माहिती आपण इंटरनेट, वृत्तपत्र वा पुस्तक या
मध्ये शोधू शकतो.
No comments:
Post a Comment