Thursday, April 26, 2018

राजकिय विरोधकांनी सुडबुध्दीने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला - डॉ.अंकुश लाड.

विरोधकांनी सुडबुध्दीने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला - डॉ.अंकुश लाड.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२६: मानवत येथील  कॉंग्रेसच्या माजी जिल्हाअध्यक्षाला शिवीगाळ केल्याप्रकरणी मानवत येथिल भाजपा युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्यावर  मानवत पोलिस ठाण्यात दिनांक २४ एप्रिल मंगळवारी रोजी मध्यरात्री  गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे राजकिय वातावरण तापले असुन डॉ.अंकुश लाड यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना म्हणाले की,हा माझ्यावर गुन्हा खोटा दाखल करण्यात आला असुन राजकिय सुडबुध्दीने हे प्रकरण दाखल करण्यात आले असुन आमच्या विकास कामानी विरोधक धास्तावले असुन त्यांचे राजकिय कारर्किर्द धोख्यात आले असल्यामुळे अशा प्रकारचे खोटे गुन्हे विरोधक दाखल करत असुन आम्ही अशा प्रकरणाला घाबरणार नसुन आ.मोहन फड यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्न करत राहणार असे ते म्हणाले.
सविस्तर वृत्त असे की  कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांना दिनांक २४ एप्रिल मंगळवारी रोजी  यांच्या राहत्या घरी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या  कार्यालयात बसले असताना डॉ. अंकुश लाड हे मद्यधुंद अवस्थेत तेथे आले व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ  करित आम्ही नगर अध्यक्षाचे जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयातुन घेऊन आलो आहोत. तुमच्याने आमचे काहीही वाकडे झालेले नाही. तुमचे बघून घेऊ. तुम्ही सतत आमच्या विरोधातील  तक्रारदाराला मदत करीत होतात  आता यापुढे आम्ही  तुमचे व्यक्तिगत पातळीवर बघून घेऊ असे धमकी देत आसल्याची तक्रार बालकिशन चांडक यांनी मानवत पोलीस स्टेशन येथे दिली होती माञ डॉ.अंकुश लाड यांनी आपल्या वरील सर्व आरोप फेटाळुन लावले असुन चाडक यांचे राजकिय कारकिर्द संपल्यामुळे ते नैराश्येतुन असे आरोप करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

                 

Tuesday, April 24, 2018

मानवत येथील के.के.एम.कॉलेजचे प्राध्यापक पवन पाटील बारहाते यांना पीएच.डी प्रदान.

प्रा.पवन पाटील बारहाते यांना पीएच.डी प्रदान.

मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.२४: मानवत येथील के.के.एम महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा.पवन प्रकाशराव पाटील बारहाते यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांच्या  उच्च व निम्न सामाजिक-आर्थिक दर्जा असलेल्या आंतरविद्यापीठीय खो- खो खेळाडूंची चिंता,ताण व मानसिक स्वास्थाचा एक अभ्यास या संशोधन कार्यास पीएच डी पदवी प्रदान केली आहे. त्यांना डॉ. एस. एस.शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
प्रा. पाटील यांच्या यशाबदल पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रूवार,उपाध्यक्ष द्वारकादास लड्डा,कोषाध्यक्ष रामचंद्र कत्रूवार ,सहसचिव अनिल नखाते,विजयकुमार दलाल,दिलीप हिबारे,बालकिशन चाडक व  संस्थचे इतर कार्यकारिणी  सदस्य, माजी प्राचार्य डॉ.अशोक चिंदुरवार,प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे,उपप्राचार्य डॉ. टी. व्ही. मुंडे व सर्व सहकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आसुन शहरातुन सर्वच स्तरावरुन त्यांना शुभेच्छा मिळत आहे.

Sunday, April 22, 2018

मानवत येथे शिवसेनेच्या वतीने पाथरी येथील आक्रोश मोर्चासाठी मानवत येथे मोटर सायकल रँलीचे आयोजन.

पाथरी येथे शिवसेनेचा शेतकरी आक्रोश मोर्चा .

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

पाथरी येथे दि .२३ एप्रिल रोजी सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले असुन या मोर्चासाठी मानवत शहरातून भव्य मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
हि मोटर सायकल रॅली सरकारी दवाखान्या समोर वेळ ठीक  ९-३० वाजता निघणार आहे . तरी मानवत तालुक्यातील  शेतकरी व नागरिकांनी या रँलीत मोठ्याप्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन  मानवत तालूका शाखा व शहर शाखा सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिकाच्या वतीने करण्यात आले आहे.

मानवत शिवसेनेच्या वतीने पाथरी येथील आक्रोश मोर्चासाठी मानवत येथे मोटर सायकल रॅली चे आयोजन.

चपाथरी येथे शिवसेनेचा शेतकरी आक्रोश मोर्चा .

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

पाथरी येथे दि .२३ एप्रिल रोजी सोमवारी                       शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले असुन या मोर्चासाठी मानवत शहरातून भव्य मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
हि मोटर सायकल रॅली सरकारी दवाखान्या समोर               वेळ ठीक  ९-३० वाजता निघणार आहे .                    तरी मानवत तालुक्यातील  शेतकरी व नागरिकांनी या रँलीत मोठ्याप्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन  मानवत तालूका शाखा व शहर शाखा सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिकाच्या वतीने करण्यात आले आहे.

Friday, April 13, 2018

सोनपेठ येथे भाजपाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आभिवादन.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना सोनपेठ भाजपाच्या वतीने विनम्र अभिवादन.

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

सोनपेठ येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने  बालाप्रसादजी मुदंडा यांच्या भगिरथी निवासस्थानी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्टनेते रमाकांतराव जाहागिरदार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष बालाप्रसादजी मुदंडा, जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे,युवा मोर्चाचे मा. प्रदेश सदस्य रंगनाथराव सोळंके, तालुका अध्यक्ष महादेव गिरे पाटील, तालुका सरचिटणीस मल्लिकार्जुन सौंदळे, शहराध्यक्ष धनंजय देशमुख, संतोष दलाल, मंगेश मुळी, पत्रकार सुदर्शन डाके आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday, April 7, 2018

मानवत येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्यां जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

मानवत येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्यां  जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.७ : मानवत येथे क्रांतिसुर्य महात्मा फुले आणि विश्वरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने १० एप्रिल  ते १४ एप्रिल दरम्यान विविध प्रबोधनात्मक व  संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन संत सावता माळी चौक येथे करण्यात आले आहे.
१० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मराठा सेवा संघाच्या राज्य प्रवक्ता ॲड वैशाली डोळस यांचे महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे.
११ एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त रोजी सकाळी दहा वाजता मोटारसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले असुन या दुचाकी फेरीचे उदघाटन माजी नगराध्यक्ष अमृतराव भदर्गे यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी सहा वाजता भारत भाग्य विधाता या महा नाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन विजय वाकोडे यांच्या हस्ते होणार आहे.  यावेळी सचिन कोक्कर, शाम चव्हाण, सत्यशिल धबडगे,  रहिम बागवान, संजय बांगड, बाबूराव नागेश्वर, वैजनाथ महिपाल, दत्ताअ चौधरी, गोविंद घाडगे, उपस्थित राहाणार आहेत.
१२ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही जलसा कार्यक्रम होणार आहे. उदघाटन डॉ अंकुश लाड यांच्या हस्ते होणार आहे. गणेश कुमावत, विनोद राहाटे, गिरीश कत्रूवार, राजेश कडतन, बाबूराव हलनोर, मोहन लाड, केशव शिंदे आदी उपस्थित राहाणार आहेत. सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे अध्यक्ष राजु खरात राहाणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात उपस्थीत  राहावे असे आव्हान  नगरसेवक राजुभैय्या खरात, नगरसेवक अनंता भदर्गे ,दिपक ठेंगे, चंद्राकांत मगर. नितीन गवळी, रवि पंडित, जनार्धन किर्तने यांनी केले आहे. 

Thursday, April 5, 2018

संभाजी ब्रिगेडच्या मानवत तालुकाध्यक्षपदी गजानन बारहाते यांची निवड!

संभाजी ब्रिगेडच्या मानवत तालुकाध्यक्षपदी गजानन बारहाते यांची निवड.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.०५: मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या मानवत तालुकाध्यक्षपदी श्री. गजानन बारहाते यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच संघटनेच्या औरंगाबाद येथे झालेल्या मराठवाडा विभागीय अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या हस्ते श्री.बारहाते यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे मराठवाडा विभागाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, शांताराम कुंजीर आदी उपस्थित होते.अधिवेशनात गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.गजानन बारहाते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात.आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून  युवकांचे संघटन मानवत तालुक्यात उभे केले आहे.त्याच्या कार्याची दखल घेत त्याची निवड करण्यात आली आहे.या निवडिबद्दल त्यांना सर्वच स्तरावरुन शुभेच्छा मिळत आहे.