मानवत येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्यां जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.७ : मानवत येथे क्रांतिसुर्य महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने १० एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान विविध प्रबोधनात्मक व संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन संत सावता माळी चौक येथे करण्यात आले आहे.
१० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मराठा सेवा संघाच्या राज्य प्रवक्ता ॲड वैशाली डोळस यांचे महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे.
११ एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त रोजी सकाळी दहा वाजता मोटारसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले असुन या दुचाकी फेरीचे उदघाटन माजी नगराध्यक्ष अमृतराव भदर्गे यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी सहा वाजता भारत भाग्य विधाता या महा नाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन विजय वाकोडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सचिन कोक्कर, शाम चव्हाण, सत्यशिल धबडगे, रहिम बागवान, संजय बांगड, बाबूराव नागेश्वर, वैजनाथ महिपाल, दत्ताअ चौधरी, गोविंद घाडगे, उपस्थित राहाणार आहेत.
१२ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही जलसा कार्यक्रम होणार आहे. उदघाटन डॉ अंकुश लाड यांच्या हस्ते होणार आहे. गणेश कुमावत, विनोद राहाटे, गिरीश कत्रूवार, राजेश कडतन, बाबूराव हलनोर, मोहन लाड, केशव शिंदे आदी उपस्थित राहाणार आहेत. सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे अध्यक्ष राजु खरात राहाणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात उपस्थीत राहावे असे आव्हान नगरसेवक राजुभैय्या खरात, नगरसेवक अनंता भदर्गे ,दिपक ठेंगे, चंद्राकांत मगर. नितीन गवळी, रवि पंडित, जनार्धन किर्तने यांनी केले आहे.
Saturday, April 7, 2018
मानवत येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्यां जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment