संभाजी ब्रिगेडच्या मानवत तालुकाध्यक्षपदी गजानन बारहाते यांची निवड.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०५: मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या मानवत तालुकाध्यक्षपदी श्री. गजानन बारहाते यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच संघटनेच्या औरंगाबाद येथे झालेल्या मराठवाडा विभागीय अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या हस्ते श्री.बारहाते यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे मराठवाडा विभागाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, शांताराम कुंजीर आदी उपस्थित होते.अधिवेशनात गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.गजानन बारहाते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात.आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून युवकांचे संघटन मानवत तालुक्यात उभे केले आहे.त्याच्या कार्याची दखल घेत त्याची निवड करण्यात आली आहे.या निवडिबद्दल त्यांना सर्वच स्तरावरुन शुभेच्छा मिळत आहे.
No comments:
Post a Comment