पाथरी विधानसभाचे आ.मोहन फड यांच्या प्रयत्नास यश
[] मानवत येथे रमजानच्या काळात महिनाभर लोडसेटीग बंद []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१९: पाथरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार मोहन फड यांनी रमजान महिण्याच्या काळात लोडसेटीग बंद करण्याची मागणी म.रा.वि.म. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती त्यांच्या या प्रयत्नास यश आले असुन मुस्लीम बाधवाच्या पविञ रमजान महिण्यात महिनाभर लोडसेटीग न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ने घेतला आहे यामुळे मानवत येथील मुस्लीम समाज आमदार मोहन फड यांचे आभार व्यक्त करित आहे.
दि.१७ मे पासुन मुस्लीम धर्मियाचा पविञ असा रमजान महिना सुरु झाला आसुन सध्या उन्हाचा कडक तडाखा बसत असताना उपवासाचा महिणा सुरु आसल्याने यामुळे मुस्लीम बांधवाना लोडसेटीग मुळे ञास होऊ नये यासाठी पाथरी,मानवत,सोनपेठ व परभणी तालुक्यातील लोडसेटीग रमजान च्या काळात महिनाभर म.रा.वि.मंडळ च्या वतीने होणारी लोडसेटीग बंद करण्यात यावी व व्यवस्थित विजपुरवठा करावा या मागणीचे विशेष बाब म्हणुन १६ मे रोजी परभणीचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांना आ.मोहन फड यांनी निवेदन देऊन लोडसेटीग बंद करण्याची मागणी करण्यात आली होती याची दखल
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने घेतली असुन रमजान काळात मानवत येथील लोडसेटीग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आमदार मोहन फड यांच्या या कार्याबद्दल मानवत येथील मुस्लीम बांधव कृतता व्यक्त करित आहे.
Saturday, May 19, 2018
आ.मोहन फड यांच्या प्रयत्नामुळे मानवत येथे रमजानच्या महिण्यात लोडसेटीग बंद!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment