हटकरवाडीच्या सरपंचपदी सौ. कांताबाई नाईक यांची एकमताने निवड.
[]तर उपसरपंचपदी नाजरिन रुस्तुम शेख यांची बिनविरोध निवड[]
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.०१: दोन महिन्यांपासून रिक्त झालेल्या हटकरवाडी तालुका मानवत येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. कांताबाई विठ्ठलराव नाईक यांची गुरूवारी दि ३१ मे रोजी एकमताने निवड करण्यात आली.
सरपंचपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा निवडणूकपुर्व अटिमुळे माजी सरपंच सखाराम जोरवर व सौ. कांताबाई नाईक यांच्यात झाला होता. या करारानुसार सरपंच श्री.जोरवर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही निवड लांबणीवर पडली. दरम्यान गुरूवारी ३१ मे रोजी सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या उपस्थितीत निवड सभा बोलाविण्यात आली. यावेळी सर्व नऊ सदस्यांनी उपस्थिती लावली. सर्व सदस्यांनी एकमताने सौ.कांताबाई विठ्ठलराव नाईक यांची निवड केली. तर उपसरपंचपदी नाजरिन रुस्तुम शेख यांचेच नाव कायम ठेवण्यात आले .त्यानंतर पिठासीन अधिकारी वसंतराव वाघमारे यांनी या निवडीला अधिकृत दुजोरा दिला. ग्राम विकास अधिकारी परमेश्वर घाटगे यांनीही पीठासीन अधिकार्यांना सहाय्य केले. यावेळी सरपंच सौ. नाईक यांचा सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बिट जमादार शेख व पोलीस नाईक जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त दिला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला.
Friday, June 1, 2018
उपसरपंचपदी नाजरिन रुस्तुम शेख यांची बिनविरोध निवड !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment