पाथरी येथे वेध भविष्याचा कार्यक्रमाचे आयोजन.
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
दि.०७: पाथरी येथील ॐ कार मल्टीस्पेशालिटि हॉस्पीटल येथे येत्या रविवारी दि.१० जुन रोजी १० वी १२ वी पास विद्याथ्याना पुढिल शिक्षणासाठी मार्गदर्शन करण्यासाठि सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी मार्गदर्शन करणार आहेत .
या एकदिवशीय कार्यशाळेचा उपयोग परिसरातील सर्व १०वी व १२वी उत्तीर्ण अनुत्तीर्ण केव्हा निकाल बाकी आहेत अशा प्रत्येक विद्यार्थिना मार्गदर्शन होणार आहे .
सर्व मुलांपर्यंत हा निरोप जाणे अतिशय महत्वाचे आहे जेणे करून त्या विध्यार्त्याला त्याच्या भविष्यासाठी योग्य तेच क्षेत्र निवडता येईल . कार्यशाळेचे हे प्रथम वर्ष आहे तरी सर्व विद्यार्थि मिञानी व पालकानी व नागरिकांनी तसेच पञकार मिञानी मोठ्याप्रमाणात उपस्थीत राहण्याचे आवाहान या कार्यक्रमाचे संयोजक डॉ.जगदिश शिंदे ॐकार मल्टीस्पेशालिटि हॉस्पीटल पाथरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment