शासनाच्या योजना गावोगावी नागरीकांपर्यत पोहचवा-आ.मोहन फड
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.५ : भारतीय जनता पक्षाची केद्रात व महाराष्ट्रात ४ वर्षापासुन सत्ता असुन या माध्यमातून शासनाच्या वतीने नागरीकांसाठी विविध योजना काढल्या आहेत त्या योजना गावोगावी नागरीकांपर्यत कार्यकर्तानी पोहचवावेत असे आवाहन पाथरी विधानसभाचे आमदार मोहन फड यांनी केले ते यावेळी सी एम चषक मानवत येथील आढावा बैठकित कार्यकर्तेना मार्गदर्शन करताना म्हणाले.
मानवत येथे दि. ४ नोव्हेंबर रविवार रोजी वाघेश्वर मंदिर नवीन गार्डन नेताजी सुभाष विद्यालय जवळ १२ वाजता सी एम चषकानिमित्य आढावा बैठकीचे आयोजन व बुथप्रमुख आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपिठावर
भाजपा चे जिल्हा अध्यक्ष अभय भाऊ चाटे, जिल्हा संघटन सरचिटणीस बाबासाहेब जामगे,युवानेते डॉ.अंकुश लाड, भाजपाचे तालुका अध्यक्ष अंनंत गोलाईत, सी एम चषकाचे जिल्हा संयोजक रंगनाथ सोळंके आदी उपस्थीत होते.
यावेळी व्यासपिठावरील मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व देशातील सर्वात मोठ्या क्रिडा व कला महोत्सव होणार असुन पाथरी विधानसभात हि या क्रिडा स्पर्धाचे आयोजन होणार आहे यासाठी कार्यकर्ता ची अडी अडचणी यावेळी जाणुन घेण्यात आल्या .या कार्यक्रमाचे प्रास्तविक अंकुश जगताप यांनी केले तर सुञसंचालन ॲड.वैजनाथ काळे यांनी केले या कार्यक्रमास पाथरी विधानसभाचे भाजपाचे कार्यकर्ते व इंद्राणी मिञमंडळाचे पदाधिकारि मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment