स्व.नेञदिप दगडु यांच्या जन्म दिनानिमित्त रोग निदान व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.१५: मानवत येथील स्वर्गिय नेञदिप नंदुभाऊ यांच्या जन्म दिनानिमित्त सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया तसेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन १७ नोव्हेंबर रोजी गोदावरी मंगल कार्यालय बांगड टॉकिज रोड येथे डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
या सर्वरोगनिदान शिबीरात मधुमेह ,र्हदयविकार,दमा,अस्थमा,पोटविकार,नेञरोग तपासणी,स्ञीरोग ,अस्थिरोग,कान नाक घसा,त्वचारोग ,बालरोग आदी आजाराचे तपासणी व रोगनिदान करण्यात येणार असुन यासाठी तज्ञ डॉकटर रुग्णाची तपासणी करनार आहे.तसेच स्वर्गिय नेञदिप नंदुभाऊ यांच्या जन्म दिनानिमित मानवत शहरातील सर्व सेवाभावी संस्था व विविध मिञमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी ईच्छुक रक्तदात्यांनी या शिबीरात येऊन रक्तदान करण्याचे आवाहान डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टचे डॉ.नारायणसा दगडु ,डॉ.निनांद दगडु ,अँड गणेश मोरे पाटिल,कुलदिप दगडु ,विशाल कडतन यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment