Sunday, May 24, 2020

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी  रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन  
                                              
सोनपेठ प्रतिनीधी / सद्दाम हुसैन 

दि.२४: सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी यावर्षीची ईदची नमाज ईदगाह मैदानाऐवजी घरातच अदा करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व ईदगाह चे इमाम हाफिज गफ्फार यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.                              .                                                                   देशात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाच्या वतिने लागू करण्यात आलेले लाँकडाऊनमध्ये कायद्याचे सुचनाचे पालन करत मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यातील तराविहची नमाज,रोजा ईफ्तारी व पाच वक्तची नमाज हे सर्व धार्मिक कार्यक्रम आज पर्यंत आपापल्या घरीच अदा केले.तसेच ईद-ऊल-फित्र ईदची नमाज देखील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर न पठन करता आपापल्या घरीच अदा करून अल्लाह कडे  प्रार्थना करावी की जगात पसरलेला कोरोना साथी पासून जगातील नागरिकांची लवकर सुटका व्हावी व देशाच्या प्रगती साठी प्रार्थना करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व हाफिज गफ्फार 
यांनी सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांना केले आहे.

No comments:

Post a Comment