Sunday, May 24, 2020

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - युवानेते डॉ.अंकुश लाड

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - युवानेते डॉ.अंकुश लाड

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.२४:  कोरोना कोव्हीड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारने  ३१ मे पर्यत लॉकडाऊन वाढवला असुन सर्व बाजारपेठ धार्मिक स्थळे बंद आहेत त्यात मुस्लीम बांधवाची रमजान ईद २५ मे रोजी होणार आहे यामुळे  मानवत येथील  मुस्लिम समाज बांधवानी ईद ऊल फिञ नमाजसाठी  मस्जिद मध्ये व ईदगाह येथे  न जाता घरातच नमाज पठण करुन  आपले विविध धार्मिक कार्य पार पाडुन ईद साजरी करावी असे  आवाहान मानवत येथील युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी केले आहे.
१४०० वर्षानंतर कदाचीत पहिलीच हि वेळ असेल जेव्हा  मुस्लिम समाजात रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये न जाता घरातच नमाज पठण करत विविध धार्मिक कार्यसह  उपवास ठेवत लॉकडाऊन   चे पालन करत  आहे व पुढिल येणाऱ्या रमजान ईद ईद ऊल फिञ हि घरातच राहुन उत्साहात साजरी करावी तसेच कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन हात मिळविने व गळाभेट टाळावी जेने करुन आपले कोरोना पासुन संरक्षण होईल तसेच देशासह जगभरातुन कोरोना नष्ट व्हावा यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करावी असे आवाहान करुन शहरातील  जनतेस रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment