Tuesday, October 27, 2020

पदविधरांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करणार - आ. सतिशभाऊ चव्हाण.

पदविधरांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करणार - आ. सतिशभाऊ चव्हाण. 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२७: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी, कॉग्रेस व शिवसेना  आघाडीचे उमेदवार आमदार सतिश चव्हाण यांनी  मानवत येथे दि.२७ ऑक्टोबर. रोजी शिक्षक ,पदविधर मतदाराशी संवाद साधुन त्यांच्या अडि अडचणी जाणुन घेतल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. सतिशभाऊ चव्हाण म्हणाले की,वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी ग्रंथालय वाढीसाठी प्रयत्न करणार 
तसेच पदविधरांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असे त्यांनी यावेळी  सांगितले . आ.सतीशभाऊ चव्हाण यांनी सकाळी ११ वाजता जेष्ट समाजसेवक तथा विधीतज्ञ गणेश मोरे पाटिल यांच्या बाजार समिती येथील आडत दुकानावर भेट दिली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला या नंतर कॉग्रेस नेते बालकिशनजी चांडक व के के एम कॉलेज येथे त्यांनी भेट दिली या नंतर तालुकाध्यक्ष सदाशिव होगे सर यांच्या शिवाजी नगर येथील निवासस्थानी भेट दिली यावेळी त्यांचा विविध संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी विधीतज्ञ गणेश मोरे पाटिल,बाळुभाऊ मोरे पाटिल,
अँड. सुरेश बारहाते,पंकज आंबेगावकर सभापती कृ.  उ. बा.स. ,संतोष लाडाणे, रामप्रसाद अवचार,डाॅ. संतोष खडसे, डाॅ.राजकुमार लडडा,डाॅ. सचिन कदम,केशव शिंदे , प्रा. मोहन बारहाते,गजमल सर , शिवसेना शहरप्रमुख बालाजी दहे, सत्यशिल धबडगे ,भैय्यासाहेब गायकवाड ,अलीम खान, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष शेख जुबेर,विठ्ठल तळेकर,उद्धव  हारकळ ,अनुरथ काळे, उध्दव भिसे,संजय लड्डा, सुनील दगडु,प्रा.नागनाथ कदम,रुपेश काबरा,सुभाषरावजी बारहाते ,मुस्तखीम बेलदार ,
कृष्णा शिंदे, मोहन महिपाल ,कृष्णा गजमल यांच्यासह सर्व बुथ प्रमुख तसेच पदविधर उपस्थित होते.

Friday, October 23, 2020

मानवत येथे शिष्यवृत्ती खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाची टाळाटाळ []राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यातर्फे तहसीलदारांना निवेदन []

मानवत येथे शिष्यवृत्ती खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाची टाळाटाळ
[]राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यातर्फे तहसीलदारांना निवेदन []
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२३: शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी शासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी राष्टियकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे परंतु राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यावर अन्याय होत असल्याचे चित्र मानवत येथे  दिसून येत आहे.

त्यामुळे शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही अल्पसंख्यांक व मागासवर्गीय समाजातील पालकांची आर्थिक परिस्थिती अगोदरच हलाखीची आहे....

त्यातून बँक खाते उघडण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्यांना पळत आहे त्याच नावाने शिष्यवृत्ती सुरु केली असली तरी तिची अंमलबजावणी करताना येणारे अडथळे लक्षात घेतले जात नाही 
त्याच्यात सध्या कोरोना च्या  पार्श्वभूमीवर..
मानवत शहरातील कॅनरा बँक,एस.बी.आय. बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद,बँक ओफ बडोद्रा, या बँक मध्ये सुविधा असून ऑनलाईन खाते उघडले जाते मात्र दहा वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांचे खाते उघडले जात नाही याकरिता विद्यार्थीचे पालक हैराण झाले .
मानवत येथील राष्ट्रीय कृती बँकात शिष्यवृत्ती साठी लागणारे खाते त्वरित उघडावे या मागणीचे निवेदन दि. २२ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यातर्फे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर कृष्णा शिंदे ,सुनील कापसे, सय्यद तजम्मुल, वैजनाथ महिपाल ,माऊली आंबेगावकर आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Tuesday, October 20, 2020

मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर

मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२०: मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि.२० आँकटोबंर रोजी महाराणा प्रताप चौक येथे टायगर ग्रुप मानवत  यांच्या वतीने करण्यात आले होते.
टायगर ग्रुप चे महाराष्ट्र अध्यक्ष  पै.तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी मोठ्या ऊत्साहाने व विविध सामाजिक कार्य करुन महाराष्ट्र भर  साजरा करण्यात येतो परंतु यंदा कोरोना या जागतिक महामारीमुळे अवाढव्य खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत व जिल्हयात रक्तांचा पुरवठा अत्यंल्प असल्यामुळे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील टायगर ग्रुप च्या कार्यकर्ते च्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान  कार्यक्रमाची सुरुवात छञपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली  यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे . रक्तदान घेण्यास  परभणी येथील न्यु लाईफ ब्लड बँक यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टायगर ग्रुप तालुका अध्यक्ष  समीरभैय्या शेख ,शहराध्यक्ष शुभम दहे,शेख वाजेद,अनील भाऊ पडूळकर,करन काळे,विष्णू उपाळे,अभी सागुंळे  आदीनी परीश्रम घेतले.

मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर.