मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२०: मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि.२० आँकटोबंर रोजी महाराणा प्रताप चौक येथे टायगर ग्रुप मानवत यांच्या वतीने करण्यात आले होते.
टायगर ग्रुप चे महाराष्ट्र अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी मोठ्या ऊत्साहाने व विविध सामाजिक कार्य करुन महाराष्ट्र भर साजरा करण्यात येतो परंतु यंदा कोरोना या जागतिक महामारीमुळे अवाढव्य खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत व जिल्हयात रक्तांचा पुरवठा अत्यंल्प असल्यामुळे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील टायगर ग्रुप च्या कार्यकर्ते च्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान कार्यक्रमाची सुरुवात छञपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे . रक्तदान घेण्यास परभणी येथील न्यु लाईफ ब्लड बँक यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टायगर ग्रुप तालुका अध्यक्ष समीरभैय्या शेख ,शहराध्यक्ष शुभम दहे,शेख वाजेद,अनील भाऊ पडूळकर,करन काळे,विष्णू उपाळे,अभी सागुंळे आदीनी परीश्रम घेतले.
No comments:
Post a Comment