मानवत येथे शिष्यवृत्ती खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाची टाळाटाळ
[]राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यातर्फे तहसीलदारांना निवेदन []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२३: शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी शासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी राष्टियकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे परंतु राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यावर अन्याय होत असल्याचे चित्र मानवत येथे दिसून येत आहे.
त्यामुळे शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही अल्पसंख्यांक व मागासवर्गीय समाजातील पालकांची आर्थिक परिस्थिती अगोदरच हलाखीची आहे....
त्यातून बँक खाते उघडण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्यांना पळत आहे त्याच नावाने शिष्यवृत्ती सुरु केली असली तरी तिची अंमलबजावणी करताना येणारे अडथळे लक्षात घेतले जात नाही
त्याच्यात सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर..
मानवत शहरातील कॅनरा बँक,एस.बी.आय. बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद,बँक ओफ बडोद्रा, या बँक मध्ये सुविधा असून ऑनलाईन खाते उघडले जाते मात्र दहा वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांचे खाते उघडले जात नाही याकरिता विद्यार्थीचे पालक हैराण झाले .
मानवत येथील राष्ट्रीय कृती बँकात शिष्यवृत्ती साठी लागणारे खाते त्वरित उघडावे या मागणीचे निवेदन दि. २२ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यातर्फे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर कृष्णा शिंदे ,सुनील कापसे, सय्यद तजम्मुल, वैजनाथ महिपाल ,माऊली आंबेगावकर आदीच्या स्वाक्षरी आहेत.
No comments:
Post a Comment