Monday, October 25, 2021

हिंगोली येथील शेख जुनेद शेख वहाब बेलदार यांची एम डी मेडिसीन साठी निवड

हिंगोली येथील शेख जुनेद शेख वहाब बेलदार यांची एम डी मेडिसीन साठी निवड 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
हिंगोली येथील बेलदारपुरा येथील रहिवासी  राज बेलदार संघटनेचे हिंगोली  जिल्हाध्यक्ष तथा जेष्ट समाजसेवक  शेख वहाब बेलदार यांचे सुपुञ  शेख जुनेद शेख वहाब बेलदार 
यांची नुकतीच एम डी मेडिसीन साठी निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरावरुन त्यांचे  कौतुक होत असुन पुढिल वाटचालीस शुभेच्छा मिळत आहे 
बेलदार समाजाचे नेते स्वर्गवासी ईजि. सय्यद अहेमद साहेब यांनी बेलदार समाजास शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले अहोराञ प्रयत्न यामुळे बेलदार समाजात शिक्षणाबद्दल आवड निर्माण झाली अहेमद साहेबाच्या खाद्याला खादा लावुन शेख वहाब बेलदार यांनी साहेबाच्या सोबत समाजसेवेचे काम करत आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले मुलांनी हि वडिलांच्या मेहनतीचे चिज करत एम बी बी एस झाल्यावर न थांबता पुढे एम डी होण्याचे स्वप्न पाहिले व ते आज पुर्ण झाले आहे शेख जुनेद शेख वहाब बेलदार यांची नुकतीच एम डी मेडिसीन साठी निवड झाली आहे 
राज बेलदार समाजातील भटक्या जमातीतुन येणारे 
शेख जुनेद शेख वहाब बेलदार यांची  एम डी मेडिसीन साठी निवड झाल्याबद्दल राज बेलदार संघटनाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि ,मा.नगरसेवक सय्यद नोमान हुसैनी कौसर,सय्यद विखार ईलाहि ,मुस्तखीम बेलदार यांनी  अभिनंदन करत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

No comments:

Post a Comment