८ नोव्हेंबरपासून मानवत बाजार समितीच्या आवारात लिलाव सुरु होणार - सभापती पंकज आंबेगावकर
मानवत / मुस्तखीम बेलदार
यंदाच्या कापूस हंगामातील बाजार समितीच्या कापूस खरेदी सुरु करण्यासाठी मुहूर्त लागला असून ८ नोव्हेंबर पासून बाजार समितीच्या यार्डात लिलाव सुरु होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांनी दिली.
कापूस हंगाम सुरु झाली असल्याने खरेदीसाठी लिलाव सुरु करण्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी दोन नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिनिंग असोशियन चे सदस्य व्यापारी, तसेच संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला संचालक गिरीशसेठ कत्रुवार, ज्ञानेश्वर मोरे पाटील माधव नानेकर, माणिकराव काळे, बाबासाहेब अवचार, हरिभाऊ गिरी, चंद्रकांत सुरवसे, जिनिंग व्यापारी रामनिवास सारडा, जुगलकिशोर काबरा, विजय पोरवाल, भगवानराव गोलाईत, सौरभ अग्रवाल ,राहुल कडतन, युनूस मिलनवाले, संदीप पेन्सलवार,बाजार समितीचे सचिव शिवनारायण सारडा, सहाय्यक सचिव संजय होगे, केंद्रप्रमुख संजय साबळे उपस्थित होते. यावेळी कापसाच्या सद्यस्थितीतील असलेल्या बाजार भाव वर चर्चा झाली व लिलाव सुरू करण्यासंदर्भात तारीख निश्चित करण्यात यावी यावर या बैठकीत चर्चा झाली. चर्चेअंती ८ नोव्हेंबर पासून कृषी उत्पन्न बाजार समिती चा यार्डात लिलाव सुरु करण्याचं निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी ८ नोव्हेंबर पासून लिलाव सुरू होत असल्याने आपला कापूस परस्पर न विक्री न करता यार्डात होणाऱ्या लिलावात आणून विक्री करावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment