Tuesday, May 17, 2022

आंबेगाव - सावळी सोसायटीवर पंकज आंबेगावकर यांचे वर्चस्व .

आंबेगाव - सावळी   सोसायटीवर पंकज आंबेगावकर यांचे वर्चस्व 

[] शेतकरी विकास पॅनेलचे सर्व ११ उमेदवार विजयी []
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत तालुक्यातील आंबेगाव - सावळी येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या गटाने सर्वच्या सर्व ११ जागा  जिंकत एकहाती वर्चस्व प्राप्त केले आहे निवडणुकीचे निकाल लागताच आंबेगावकर यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला.
विविध कार्यकारी सेवा संस्था आंबेगाव या संस्थेची पुढिल पंचवार्षिक संचालक निवडीसाठी रविवारी दि. १५ मे रोजी मतदान पार पडले विद्यमान बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर यांच्या हा मतदारसंघ असल्याने या निवडणुकीसाठी विशेष महत्त्व प्राप्त झाले होते  परिवर्तन शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून विरोधकांनी  पंकज आंबेगावकर यांच्याविरोधात मोट बांधली होती त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली  होती मात्र ११ जागेसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत सभापती पंकज आंबेगावकर याच्या शेतकरी विकास पॅनेलचने   सर्व ११ जागावर  विजय संपादन करीत सोसायटी ताब्यात घेतली या निवडणुकित  सर्व अकरा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले .
या निवडणुकीत विजयी उमेदवार पंकज जाधव ,केशव काळे, दत्ता काळे ,बाबासाहेब काळे ,लक्ष्मण काळे ,मीरा काळे ,गंगा काळे, ज्ञानेश्वर रासवे, चंद्रकांत जाधव, दत्ता जाधव, मारुती जाधव यांचा समावेश आहे तर राखीव प्रवर्गातील दोन जागा रिक्त राहिल्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शेख उस्मान , अण्णासाहेब बारहाते  व होगे यांनी काम पाहिले.
विशेष म्हणजे जिल्हा पातळीवर नेत्यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते या निकालाने पुढे होणाऱ्या मानवत  बाजार समिती निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत हे माञ  निच्शित आहे असे राजकिय जाणकार म्हणत आहेत.

No comments:

Post a Comment