नारेगाव ऊर्दु प्राथमिक शाळा येथे शाळा पुर्व तय्यारी मेळावा संपन्न
औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार
दि. १५ जून २०२२ रोजी नारेगाव येथील महानगर पालिका उर्दू शाळा येथे केन्द्रिय मुख्याध्यापिका श्रीमती ताजवे मँडम व मुख्याध्यापक श्री. रहिम सर यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२-२३ या शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा २ यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन डाएटच्या अधिव्याख्याता श्रीमती भारती फिल्लारे मॅडम , श्री.झेरपे सर,व मल्लीकार्जुन सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी पालकांनी ऊत्साहपुर्ण हजेरी लावली यावेळी विद्यार्थीचे गुलाबपुष्प व चाँकलेट देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शिक्षकांनी वेगवेगळी खेळनी व कृतीयुक्त पध्दतीने विद्यार्थ्याची क्षमता चाचणी केली यावेळी सर्व शिक्षक वृंद, पालक व शाळा प्रवेश पात्र विद्यार्थी उपस्थीत होते.
Good work .keep it up we r proud of u
ReplyDelete