पाऊस पडावा यासाठी मानवत येथे मुस्लीम बांधवाच्या वतीने सामुहिक प्रार्थना
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत सह पुर्ण राज्यात पाऊस पडावा या साठी मुस्लिम समाज बांधवांनी दिनांक ६ सप्टेंबर रोजी उक्कलगाव रोड येथील इदगाह मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता सामुहिक रित्या नमाज पठण करुन पाऊसासाठी प्रार्थना करण्यात आली.
मौलाना सुलतान मिल्ली यांनी नमाज अदा केली व पाऊस चांगला पडावे शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न व्हावे व सर्व लोक सुखी राहावे यासाठी प्रार्थना केली.
गेल्या काही महिन्यापासून पावसाने खंड पडला आहे .सध्या शहरासह तालुक्यात उन्हाचा चटका वाढत आहे .. सातत्याने पाऊस नसल्यामुळे कापसाने आपली माने खाली टाकलेली आहे सोयाबीन पिवळे पडून करपून जात आहे शेतकरी राजा हतबल झाला आहे यासाठी मानवत शहरांमध्ये दिनांक ६-७-८- सप्टेंबर रोजी इदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात येत आहे.. शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी इदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता तसेच शुक्रवारी दुपारी तीन वाजता नमाजसाठी उपस्थीत राहण्याचे आवाहान शहरातील धर्मगुरु च्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment