सकल मराठा समाजाच्या वतीने २ सप्टेंबर रोजी मानवत बंद ची हाक !
मानवत / मुस्तखीम बेलदार
अंतरवाली (सराटी) ता.अंबड जि. जालना येथे मराठा आरक्षण साठी उपोषणास बसलेल्या मराठा समाज बांधवावर पोलीसानी अमानुष पणे लाठिचार्ज करत महिला व पुरुषांना बेदम मारहान केल्या प्रकरणी पोलीस प्रशासन व सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी मानवत येथील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने दि.२ सप्टेंबर शनीवार रोजी मानवत बंद ची हाक देण्यात आली आहे या बाबत मानवत पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांना मानवत येथील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे .
मौजे अंतरवाली (सराटी) ता. अंबड जिल्हा जालना येथे मनोज जरांगे पाटील व गावकरी यांचे मराठा आरक्षण साठी गेल्या तीन दिवसापासून शांततेत उपोषण सुरू होते, पण आज सरकारने पोलीस बळाचा वापर करून उपोषण कर्ते व गावकरी यांच्यावर अमानुष पणे लाठी चार्ज करून उपोषण उधळून लावले आहे. यात काही गावकरी व महिला सुध्दा जखमी झालेले आहेत. याच्या निषेधार्थ दिनांक ०२/०९/२०२३ रोजी वार शनिवार रोजी मानवत बंदची हाक
देण्यात येत आहे तरी सर्व समाज बांधवांनी स्वयंपुर्तीने मानवत बंदमध्ये सहभागी व्हावे अशी विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने प्रसिद्धी पञिकेद्वारे निवेदनात करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment