राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अँड.लुकमान बागवान यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत येथील समाजसेवक अँड.लुकमान बागवान यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड दि.२६ जुलैरोजी राष्ट्रवादी भवन बसमत रोड परभणी येथे करण्यात आली.
माननीय खासदार शरद पवार यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न कराल पक्षाने आपणास दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार
जयंत पाटील यांनी दिलेले पक्षाचे कार्यक्रम व ध्येय धोरणांची अमलबजावणी आपण करावी अशा आशयाचे पञ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा.आ.अँड. विजय गव्हाणे यांच्या स्वाक्षरीने अँड. लुकमान बागवान यांना देण्यात आले आहे. या निवडिचे सर्व स्तरावर स्वागत होत असुन त्यांना पुढिल कार्यास शुभेच्छा मिळत आहे.