मानवत येथील कलीम तांबोळि यांची शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उप प्रमुख पदि निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत येथील समाजसेवक कलीम तांबोळि यांची शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उप प्रमुख पदि निवड शिवसेना नेते तथा प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना महाराष्ट्र राज्य सईद खान यांच्यां प्रमुख उपस्थितीत दि.२० जुलै रोजी शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालय पाथरी येथे करण्यात आली .
खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्यां आदेशाने शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उप प्रमुख पदि आपली नियुक्ती करण्यात येत असून आपण पक्षाचा अधिक विस्तार करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार तळगाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न कराल, पक्षाने आपणास दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विश्वास व्यक्त करतो असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना महाराष्ट्र राज्य सईद खान यांनी यावेळी केले . सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत निवडिचे पञ कलीम तांबोळि
यांना देऊन त्यांना पुढिल कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी जिल्हा प्रमुख नाना टाकळकर, युसुफोदीन अन्सारी, तालुका प्रमुख विठ्ठल काका रासवे,अल्पसंख्यांक शिवसेना मानवत तालुकाध्यक्ष पै .शेख समीर , युनूस भाई कुरेशी, गजु भाऊ टोके, अनवर दादा, साजिद राज, संजय रासवे, शिवसेना अल्पसंख्यक तालुका प्रमुख अहेमद अत्तार, शेख मोहसीन, शफि भाई, सय्यद मोहसीन,वली पाशा कुरेशी व कार्यकर्ते पद अधिकारी नगरसेवक आदीसह मोठ्यासंख्येने शिवसैनिक उपस्थीत होते.कलीम तांबोळि यांची शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उप प्रमुख पदि निवड झाल्याने त्यांना सर्व स्तरावरुन शुभेच्छा मिळत आहे.
No comments:
Post a Comment