Wednesday, December 11, 2024

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मानवत कळकळीत बंद!

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मानवत कळकळीत बंद
मानवत / मुस्तखीम बेलदार 
परभणी येथे दि.१० डिंसेबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या  प्रतिमेची  विटंबना करण्यात आली होती या घटनेच्या  निषेधार्थ मानवत येथील  समस्त आंबेडकर अनुयायी व संविधान प्रेमी जनतेकडुन दि.११ डिंसेबर रोजी मानवत शहरातील व्यापाऱ्यानी सह स्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने  बंद करुन निषेध करत तहसिल कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे.
परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर ठेवलेल्या संविधानाची प्रतिमा सोपान दत्तराव पवार रा. मिर्झापुर ता. जि. परभणी या व्यक्तीने उचलून रोडवर फेकून दिली आहे. या व्यक्तीवर देशद्रोही चे गुन्हे दाखल करुन त्यास कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी.

तसेच या देशद्रोही व्यक्तीच्या पाठीशी कोणती जातीवादी व देशद्रोही शक्ती आहे याची चौकशी करुन त्या सर्वांना कठोर शासन करण्यात यावे. या मागणीसाठी  दि.११ डिसेंबर रोजी मानवत शहर बंद ठेवून निषेध नोंदविण्यात येत आहे.
वरील सर्व घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
यावेळी  शैलेष वडमारे, राजुभैय्या खरात,अनंत भदर्गे ,
संपत पंडित , जनार्धन किर्तने ,गोविंद घांडगे,  रविभाऊ पंडीत ,दिपक ठेंगे ,राहुल डाके ,धम्मपाल सोनटक्के ,नंदुभाऊ कुमावत , सत्यशिल धबडगे ,नागसेन भदर्गे ,राहुल कुभकर्ण ,शेख वाजेद ,शेख मुस्ताक , शगीर खान यांच्यांसह मोठ्यासंख्येने  आंबेडकर अनुयायी व संविधान प्रेमी नागरीक उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment