परभणी शहरामधील कोम्बींग ऑपरेशन थांबवा मानवत येथील आंबेडकरवादि नागरीकांची मागणी
मानवत / मुस्तखीम बेलदार
परभणी शहरामधील कोम्बींग ऑपरेशनातील होत असलेली धरपकड प्रशासनाने तात्काळ थांबवावी या मागणीचे निवेदन मानवत तहसिलदार पांडुरंग माचेवाड याच्यां मार्फत जिल्हाधिकारी साहेब परभणी व जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब परभणी यांना दि.१२ डिंसेबर रोजी मानवत शहारातील आंबेडकरवादि नागरीकांच्या वतीने देण्यात आले आहे.
परभणी शहरामधील कोम्बींग ऑपरेशन धरपकळ तात्काळ थांबविण्यात यावी
दि. ११/१२/२०२४. रोजीच्या परभणी येथिल बौध्द समाजाच्या महामोर्चाला गालबोट लागल्यामुळे परभणी शहरामध्ये पोलीसांमार्फत कोम्बींग ऑपरेशन धरपकड राबविण्यात येत आहे ते तात्काळ थांबवावे बौध्द समाजाच्या लोकांवर जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल करण्यात येवू नये वरील विषयास मे. साहेबांनी तात्काळ दखल घेवून कोम्बींग ऑपरेशन धरपकड तात्काळ
थांबविण्यात यावी नसता मानवत तालुक्यातील हजारो नागरीक आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
निवेदनावर रवि पंडी, दिपक ठेंगे, नंदु कुमावत ,नागसेन भदर्गे ,ॲड आनंद वाघमारे
,करण ब्रम्हराक्षे ,छगन भदर्गे , कैलास शिंदे ,हरिचद्र सुखले, महेन्द्र नारायण ठेंगे
, उबसंल कांबळे ,शरद कांबळे , अनीस शेख
याच्यासह आंबेडकरवादी नागरीकांच्या स्वाक्षरी आहेत.
No comments:
Post a Comment