मानवत येथील अनीस राज यांना आदर्श पालक पुरस्कार जाहिर
मानवत/ मुस्तखीम बेलदार
मानवत येथील समाजसेवक तथा माजी नगरसेवक महम्मद अनीस महम्मद ईसाक राज यांची आदर्श पालक पुरस्कारासाठी निवड झाली असून, ही घोषणा राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि राज यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ शुक्रवार रोजी नमाज-ए-जुमा नंतर परभणी येथील दरगाह रोडवरील मास्टर कॅफे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे
कार्यक्रमास आमदार राहुल पाटील , खासदार संजय उर्फ बंडु जाधव , बेलदार समाजाचे मार्गदर्शक सय्यद नजमुल हसन , मा. राज्यमंत्री सुरेश वरपुडकर ,कार्यकारी अध्यक्ष अब्दुल्ला राज , युवानेते वसीम बेलदार , बळीरामजी अरगडे ,जिल्हाध्यक्ष सय्यद अबुजर हुसैनी , उपाध्यक्ष सय्यद विखार ईलाहि , महाराष्ट्र संघटक मुस्तखीम बेलदार , समाजसेवक साजेद बेलदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अनीस राज यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज बेलदार समाजसेवा मंडळाचे मानवत तालुका अध्यक्ष असीरखान ,उपाध्यक्ष महम्मद इद्रिस , सचिव शेख करिम कोषाध्यक्ष महम्मद मुस्तकिम, सल्लागार सय्यद मोबीन राज तसेच सदस्य अय्युब राज, शेख ईस्माईल , शेख एजास ,मोहम्मद सुलतान मौलाना ,अब्दुल अजीस , अब्दुल अजीम , एकबाल राज आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.
No comments:
Post a Comment