Friday, May 8, 2026

गौरी गोविंद पौळ यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

गौरी गोविंद पौळ यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शहरातील प्रसिद्ध शकुंतला विद्यालय मानवत येथील विद्यार्थिनी गौरी गोविंद पौळ हिने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात ९४ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
गौरीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या मेहनतीला तसेच पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाला या यशाचे श्रेय दिले जात आहे.
गौरी हिचे वडील गोविंद पौळ यांनी मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच शाळेचे शिक्षक घनाटे सर, खंदारे सर, पवार सर आणि पातेकर मॅडम यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Uploaded Image