Tuesday, March 20, 2018

पञकारांवरील खोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा पञकार संघ मानवतच्या वतीने आंदोलन - सत्यशिल धबडगे


पञकारावरील खोटे गुन्हे मागे घ्या;मानवत पञकार संघाची मागणी.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२०:  परभणी येथील पञकारावर खोटे गुन्हे दाखल करुन चौथ्या स्तंभावर आघात करण्याचा प्रयत्न होत असल्या प्रकरणी मानवत पञकार संघाच्या वतीने काळ्याफिती लावुन आज दि.२० मार्चरोजी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पञकारावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
इयत्ता दहावीच्या विज्ञान तञज्ञान विषयाची प्रश्नपञीका व्हाईरल झाली व अनेक मोबाईलवर  प्रश्नपञीका फिरल्या  प्रकरणाची संबंधीत पेपर सुटल्या नंतर पेपर परताळून पाहिले आसता तंतोतंत निघाली या सदर्भात माध्यमिक शिक्षणधिकारी यांच्याशी संवाद  साधला त्यानंतर त्यांची रितसर प्रतिक्रियासह दि.१४ मार्च रोजी दैनिक लोकमत व दैनिक पुण्यनगरी या वृत्तमानपञात  बातमी प्रसिद्धी झाली.
तथापि या बाबतीत शहानिशा करून  जिल्हा शिक्षणधिकारी यांना माहिती देवून ही जिल्हा शिक्षण विभाग परभणी यांनी नवामोढा पोलिस स्टेशन परभणी येथे दैनिक लोकमत जिल्हाप्रतिनिधी व दैनिक पुण्यनगरी जिल्हाप्रतिनिधी यांच्या  विरूध्द कलम ५ (१) , ५ (२) म वि गैर कायदा १९८२ व कलम ७२ नुसार शहानिशा न केल्या बातमी छापल्या बदल गुन्हा दाखल   केला . हा प्रकार  म्हणजे चाललेला गैरप्रकार माध्यमाने उघडकीस आनुनये  म्हणून हे  कारस्थान  रचल्याचे  दिसत आहे. वास्तविक पहाता  संबंधित दैनिकांच्या जिल्हाप्रतिनिधीनी रितसर शहानिशा करूनच पेपर व्हाईरल चे वृत्त प्रसिध्द केले असताना चक्क बातमी  का छापली म्हणून  त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करणे म्हणजे लोकशाही च्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्या सारखे आहे परभणी जिल्हात दहावी व बारावी परीक्षेत  कॉपी चा सुळसुळाट आहे तर अनेक परिक्षा केंद्रावर गैरप्रकार होत आहेत प्रश्नपञीका  मोबाईल व्हाईरल होत आहेत. कालपरावा वर्धा येथे पेपरफुटी प्रकरणी संशियत आरोपी म्हणून परभणी येथिल आरोपी वर गुन्हा दाखल झाला आहे  हे सर्व होत आसताना  प्रसारमाध्यमानी डोळाझाक काम करावे आमचे गैर कृत्य उघडकीस आनुनये म्हणुन  शिक्षण विभागाच्या अधिकाराना वाटत आहे वरील प्रकरणी दैनिक लोकमत दैनिक पुण्यनगरी यांच्या पञकारांवर गुन्हे दाखल केले आहेत हे गुन्हे मागे घेण्यात यावेत व तसेच कॉपी प्रकरणी डोळाझाक करणाऱ्या शिक्षणधिऱ्या विरूद्ध कारवाई करण्यात यावी असे निवेदन मानवत  तहसिलदार नखुल वाघुंडे यांना मानवत तालुका पञकार संघाच्या वतिने देण्यात आले .यावेळी मानवत तालुका पञकार संघाचे तालुका अध्यक्ष सत्यशिल धबडगे , मा.ता.पञकार माजी.अध्यक्ष कचरूलाला बारहाते , पञकार संघाचे सचिव प्रा.गोविंद गोलाईत ,पञकार संघाचे उपध्यक्ष मुस्तकिम बेलदार, भैय्यासाहेब गायकवाड , विलास बारहाते ,डॉ.सचिन चिद्रवार ,शामभाऊ झाडगावकर , हफिस बागवान , अलिम खान ,ईरफान बागवान ,राजु पठाडे  उपस्थीत होते.

Friday, March 9, 2018

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी राजुभैय्या खरात यांची निवड.

मानवत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनीक जयंतीची कार्यकारीनी जाहीर.

[]अध्यक्षपदी राजकुमार खरात तर कार्यअध्यक्ष म्हणुन दिपक ठेंगे यांची निवड []

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०८: मानवत शहरात प्रती वर्षा प्रमाने या ही वर्षी महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न  भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  १२७ व्या संयुक्त  जयंतीचे आयोजन मानवत शहरात करण्यात येनार आहे त्यासाठी त्याची  कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन  अध्यक्ष म्हणुन लोकप्रिय नगरसेवक राजकुमार खरात तर कार्यध्यक्षपदी दिपक ठेंगे तर स्वागतध्यक्ष पदी सोमदत्त भदर्गे  यांची सर्वानुमते  बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मानवत येथील शासकीय विश्रामगृहात दि. ८ मार्च २०१८ रोजी सांयकाळी ७ वाजता माजी नगर सेवक बन्सीदादा भदर्गे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत महात्मा फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या सार्वजनिक जयंती च्या अध्यक्ष पदी लोकप्रिय नगर सेवक राजकुमार  खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सार्वजनिक  जयंती ची  कार्यकारणी खालीलप्रमाणे घोषित करण्यात आली स्वागतअध्यक्षपदी सोमदत्त भदर्गे , सचिव पदी नितीन गवळी , कार्यध्यक्ष पदी दिपक ठेंगे , कोषाध्यक्षपदी जनार्धन किर्तने ,सहसचिवपदी रवि पंडीत , तर मुख्यसल्लागार पदी माजी नगरअध्यक्ष अमृत भदर्गे , नगरसेवक अनंत भदर्गे , आशोकदादा पंडीत ,तुळशीराम डाके , संपत पंडित , गजानन बारहाते ,धम्मपाल सोनटक्के , नारायण धबडगे , आशोक धापसे , महेद्र ठेंगे , सत्यशिल धबडगे ,सचिन रनखाब , संजय उजगरे , रामाभाऊ जोधळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .या बैठकीचे प्रस्ताविक चंद्रकांत मगर यांनी मांडले तर आभार बन्सीदादा भदर्गे यांनी मानले यावेळी शहरातील सर्व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत  होते.या निवडिचे शहरात सर्वच स्तरावर स्वागत होत असुन कार्यकारणीस शुभेच्छा मिळत आहे.

आ.मोहन फड यांच्यावतीने महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन.

आ.मोहन फड यांच्यावतीने महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन.
मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.०८: पाथरी विधानसभाचे आमदार मोहन फड यांच्या वतीने महिलादिनानिमित्त आरोग्य शिबिर  आयोजित करण्यात आले होते या  शिबिरात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात गर्भपिशवीच्या आजारांच्या महिलांना आज दिनांक ९ मार्च रोजी मानवत रोड रेल्वेस्टेशन येथुन तपोवन रेल्वेन डॉ.डी.वाय पाटील हास्पिटल मुंबई येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले या रुग्णांचा जाण्यायेणाचा व जेवणाचा संपुर्ण खर्च आमदार मोहन फड करत आहेत .या वेळी पांडुरंग नखाते ,शिंदें मनोलीकर ,बाबा शेख व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार साहेबांनी नागरिकाच्या आरोग्यासाठी आता पर्यत गंभीर  विविध आजारपणाने ञस्त नागरिकांना मोफत  उपचार सुरु करुन एक मोठे समाजकार्य मतदारसंघात सुरु केले असल्याने नागरीक आनंद व समाधान व्यक्त करीत आहे.

Tuesday, March 6, 2018

मानवत येथे शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप.

मानवत येथे शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकाचे वाटप.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.०६: मानवत शहरातील शिवनेरी प्रतिष्ठानचा स्पर्धा परिक्षा केंद्रात शिवजयंतीचे निमित्ताने विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकाचे वाटप करून विधायक उपक्रमातुन शिवजयंती साजरी करण्यात आली.
नगरसेवक ॲड.किरण सुरेशराव बारहाते आपल्या शिवनेरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासुन शहरातील रचना
कॉलनी येथे विनामूल्य स्पर्धा परिक्षा केंद्र चालवितात.या ठिकाणी शहरातील चाळीस-पन्नास विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षाची तयारी करतात.या केंद्राचे  शिवनेरी प्रतिष्ठान कडून व्यवस्थापन केले जाते .सर्व सदस्य आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून या स्पर्धा परिक्षा केंद्राचे व्यवस्थापन करतात.या ठिकाणी स्पर्धा परिक्षासाठी आवश्यक असणारी पुस्तके व इतर साधनसामग्री विनामूल्य दिली जाते. ॲड.बारहाते यांनी विद्यार्थ्यांची  गरज ओळखून विद्यार्थ्यांनी सांगितलेली पुस्तके उपलब्ध त्यांना करून दिली.
ॲड.बारहाते यांनी पुणे येथून मागवलेली नव्वद पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाचे शहरात कौतुक केले जाते. ही पुस्तके पुणे येथून आणण्यासाठी डॉ. परमेश्वर तिडके व ॲड. अरविंद खेडकर पाटील यांनी मदत केली.
या वेळी प्रसाद जोशी,सुरेश चव्हाण , प्रा.किशन बारहाते,विष्णु लाड,संदीप काळे,नितीन लाड,शशिकांत नेवरेकर आदी उपस्थित होते.

Monday, March 5, 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या अध्यक्ष पदी विजय खरात यांची बिनविरोध निवड .

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती च्या अध्यक्ष पदी विजय खरात यांची बिनविरोध निवड .

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०५: मानवत येथिल बौध्दनगर नगर येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती  भव्य दिव्य साजरी करण्यासाठी बौध्दनगर येथे दि.२८ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ८ वाजता कमशिल बुध्दविहार येथे माजी नगरसेवक बन्सी भदर्गे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  घेण्यात आली .
१४ एप्रिल २०१८ रोजी होणाऱ्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती अध्यक्ष पदी विजय खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर खालीलप्रमाणे कार्यकारणी ची निवडित  उपाध्यक्षपदी विजय धबडगे ,सचिव योगेश गायकवाड , कोषाध्यक्ष बापुराव धबडगे , सहसचिव अमोल डंबाळे , कार्यध्यक्ष जनार्धन किर्तने तर सल्लागार समिती वर सखाराम व्हावळे , मुंजाजी गायकवाड , किशोर भदर्गे , विष्णू भदर्गे , अभिमान धबडगे , उत्तम घनघाव ,मुंजाजी घनघाव , लहु अंभोरे , बाबाराव भदर्गे  यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी प्रभाग दोन चे नगरसेवक अनंत भदर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारणी चे निवडीचे कार्यक्रम संपन्न झाला तर बौध्दनगर मधिल उपासक मोठ्या संख्येने या  बैठकीस सहभागी झाले होते या निवडिबद्दल अध्यक्ष व पदाधिकारिना शुभेच्छा मिळत आहे.

Sunday, March 4, 2018

युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या प्रमुख उपस्थीत स्नेहसम्मेलनाचे आयोजन.

युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या प्रमुख उपस्थीत स्नेहसम्मेलनाचे आयोजन संपन्न .

मानवत / मुस्तखीम बेलदार

मानवत येथिल आनंदवन इंटरनॅशनल स्कुल चा दुसरा 'तरंग' हा रंगारंग स्नेहसंमेलन कार्यक्रम मंगळवार दि.२७ फेब्रुवारी रोजी युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या प्रमुख उपस्थीत स्नेहमेळाव्याचे आयोजन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेच्या वतिने सामाजिक संवेदना जोपासत जन्मभूमी फाऊंडेशन ला गरीब शेतकरी कुटूंबाला मदत करण्या साठी विस हजार रुपये मदतीचा धनादेश संस्थापक अध्यक्ष शेख अली यांनी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमा साठी जि.प. च्या उपाध्यक्षा तथा शिक्षण आणि आरोग्य सभापती सौ भावनाताई नखाते,युवानेते डॉ.अंकुश लाड, मानवत पालीकेच्या नगराध्यक्षा स्वामी, पाथरी न. प .चे गट नेते जुनेदखान दुर्रांनी, नगरसेवक अलोक चौधरी, माजी उपनगराध्यक्ष लालू खान, शहजाद लाला जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष सदाशिव थोरात, सचिव किरण घुंबरे आनंदवन चे संस्थापक अध्यक्ष शेख अली, संस्था अध्यक्षा सौ .शेख शमा अली, प्राचार्या प्रिया जोशेफ यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली या वेळी जागतीक स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल आणि रोख रकमेचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या वेळी गरीब शेतकरी कुटूंबाला मदत करण्या साठी जन्मभूमी फाऊंडेशन ला २० हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. आणि गरीब शेतक-यांच्या पाच मुलींना कोठेही शिक्षणा साठी लागणा-या संपुर्ण खर्चाची जबाबदारी मौलाना आझाद ब.से.संस्था तालखेड संचालीत आनंदवन इंटरनॅशनल स्कूल ने घेतली त्या मुलींची शिफारस जन्मभूमी फाऊंडेशन ने करावी अशी घोषणा या वेळी प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष शेख अली यांनी केली. या नंतर बालगोपाळांच्या तरंग या रंगारंग स्नेहसंमेलन कार्यक्रमाला सुरूवात झाली. यात प्रारंभी भरतनाट्यम, मोबाईलचा अती वापर कसा होतोय हा मुकाभिनय, या नंतर हवा हवाई,हवा हवा, विनोदी गिते, वंदेमातरम, वंदे मातरम, काला चष्मा असे गित सादर केले तर घुमर घुमर या नृत्यावर महिला पालकांनी ठेका धरत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रिया जोशेफ,अमिता सोनी यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापीका आश्विनी हिबारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी आश्विनी हिबारे,पेरेना जैन,आरती पवार, संदिप चंद्रन, शेख जमीर, कुलकर्णी मॅडम, फटाले, राऊत यांनी परिश्रम घेतले.

Friday, March 2, 2018

मानवत येथील आनंदवन इंटरनॅशनल स्कुल येथे 'तरंग' हा रंगारंग स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न .

मानवत येथील आनंदवन इंटरनॅशनल  येथे  स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न .

मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.०२:- मानवत येथील आनंदवन इंटरनॅशनल स्कुल चा दुसरा 'तरंग' हा रंगारंग स्नेहसंमेलन कार्यक्रम मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेच्या वतिने सामाजिक संवेदना जोपासत जन्मभूमी फाऊंडेशन ला गरीब शेतकरी कुटूंबाला मदत करण्या साठी विस हजार रुपये मदतीचा धनादेश संस्थापक अध्यक्ष शेख अली यांनी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमा साठी जि प च्या उपाध्यक्षा तथा शिक्षण आणि आरोग्य सभापती सौ भावनाताई नखाते, मानवत पालीकेच्या नगराध्यक्षा स्वामी, पाथरी न प चे गट नेते जुनेदखान दुर्रांनी, मानवत न प चे उपनगराध्यक्ष डॉ अंकूश लाड, नगरसेवक अलोक चौधरी, माजी उपनगराध्यक्ष लालू खान, शहजाद लाला जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष सदाशिव थोरात, सचिव किरण घुंबरे आनंदवन चे संस्थापक अध्यक्ष शेख अली, संस्था अध्यक्षा सौ शेख शमा अली, प्राचार्या प्रिया जोशेफ यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली या वेळी जागतीक स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल आणि रोख रकमेचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या वेळी गरीब शेतकरी कुटूंबाला मदत करण्या साठी जन्मभूमी फाऊंडेशन ला २० हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. आणि गरीब शेतक-यांच्या पाच मुलींना कोठेही शिक्षणा साठी लागणा-या संपुर्ण खर्चाची जबाबदारी मौलाना आझाद ब.से.संस्था तालखेड संचालीत आनंदवन इंटरनॅशनल स्कूल ने घेतली त्या मुलींची शिफारस जन्मभूमी फाऊंडेशन ने करावी अशी घोषणा या वेळी प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष शेख अली यांनी केली. या नंतर बालगोपाळांच्या तरंग या रंगारंग स्नेहसंमेलन कार्यक्रमाला सुरूवात झाली. यात प्रारंभी भरतनाट्यम, मोबाईलचा अती वापर कसा होतोय हा मुकाभिनय, या नंतर हवा हवाई,हवा हवा, विनोदी गिते, वंदेमातरम, वंदे मातरम, काला चष्मा असे विविध  गित सादर केले तर घुमर घुमर या नृत्यावर महिला पालकांनी ठेका धरत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रिया जोशेफ,अमिता सोनी यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापीका आश्विनी हिबारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी आश्विनी हिबारे,पेरेना जैन,आरती पवार, संदिप चंद्रन, शेख जमीर, कुलकर्णी मॅडम, फटाले, राऊत यांनी परिश्रम घेतले.