Tuesday, March 6, 2018

मानवत येथे शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप.

मानवत येथे शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकाचे वाटप.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.०६: मानवत शहरातील शिवनेरी प्रतिष्ठानचा स्पर्धा परिक्षा केंद्रात शिवजयंतीचे निमित्ताने विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकाचे वाटप करून विधायक उपक्रमातुन शिवजयंती साजरी करण्यात आली.
नगरसेवक ॲड.किरण सुरेशराव बारहाते आपल्या शिवनेरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासुन शहरातील रचना
कॉलनी येथे विनामूल्य स्पर्धा परिक्षा केंद्र चालवितात.या ठिकाणी शहरातील चाळीस-पन्नास विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षाची तयारी करतात.या केंद्राचे  शिवनेरी प्रतिष्ठान कडून व्यवस्थापन केले जाते .सर्व सदस्य आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून या स्पर्धा परिक्षा केंद्राचे व्यवस्थापन करतात.या ठिकाणी स्पर्धा परिक्षासाठी आवश्यक असणारी पुस्तके व इतर साधनसामग्री विनामूल्य दिली जाते. ॲड.बारहाते यांनी विद्यार्थ्यांची  गरज ओळखून विद्यार्थ्यांनी सांगितलेली पुस्तके उपलब्ध त्यांना करून दिली.
ॲड.बारहाते यांनी पुणे येथून मागवलेली नव्वद पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाचे शहरात कौतुक केले जाते. ही पुस्तके पुणे येथून आणण्यासाठी डॉ. परमेश्वर तिडके व ॲड. अरविंद खेडकर पाटील यांनी मदत केली.
या वेळी प्रसाद जोशी,सुरेश चव्हाण , प्रा.किशन बारहाते,विष्णु लाड,संदीप काळे,नितीन लाड,शशिकांत नेवरेकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment