मानवत येथील आनंदवन इंटरनॅशनल येथे स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न .
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.०२:- मानवत येथील आनंदवन इंटरनॅशनल स्कुल चा दुसरा 'तरंग' हा रंगारंग स्नेहसंमेलन कार्यक्रम मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेच्या वतिने सामाजिक संवेदना जोपासत जन्मभूमी फाऊंडेशन ला गरीब शेतकरी कुटूंबाला मदत करण्या साठी विस हजार रुपये मदतीचा धनादेश संस्थापक अध्यक्ष शेख अली यांनी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमा साठी जि प च्या उपाध्यक्षा तथा शिक्षण आणि आरोग्य सभापती सौ भावनाताई नखाते, मानवत पालीकेच्या नगराध्यक्षा स्वामी, पाथरी न प चे गट नेते जुनेदखान दुर्रांनी, मानवत न प चे उपनगराध्यक्ष डॉ अंकूश लाड, नगरसेवक अलोक चौधरी, माजी उपनगराध्यक्ष लालू खान, शहजाद लाला जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष सदाशिव थोरात, सचिव किरण घुंबरे आनंदवन चे संस्थापक अध्यक्ष शेख अली, संस्था अध्यक्षा सौ शेख शमा अली, प्राचार्या प्रिया जोशेफ यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली या वेळी जागतीक स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल आणि रोख रकमेचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या वेळी गरीब शेतकरी कुटूंबाला मदत करण्या साठी जन्मभूमी फाऊंडेशन ला २० हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. आणि गरीब शेतक-यांच्या पाच मुलींना कोठेही शिक्षणा साठी लागणा-या संपुर्ण खर्चाची जबाबदारी मौलाना आझाद ब.से.संस्था तालखेड संचालीत आनंदवन इंटरनॅशनल स्कूल ने घेतली त्या मुलींची शिफारस जन्मभूमी फाऊंडेशन ने करावी अशी घोषणा या वेळी प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष शेख अली यांनी केली. या नंतर बालगोपाळांच्या तरंग या रंगारंग स्नेहसंमेलन कार्यक्रमाला सुरूवात झाली. यात प्रारंभी भरतनाट्यम, मोबाईलचा अती वापर कसा होतोय हा मुकाभिनय, या नंतर हवा हवाई,हवा हवा, विनोदी गिते, वंदेमातरम, वंदे मातरम, काला चष्मा असे विविध गित सादर केले तर घुमर घुमर या नृत्यावर महिला पालकांनी ठेका धरत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रिया जोशेफ,अमिता सोनी यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापीका आश्विनी हिबारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी आश्विनी हिबारे,पेरेना जैन,आरती पवार, संदिप चंद्रन, शेख जमीर, कुलकर्णी मॅडम, फटाले, राऊत यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment