मानवत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनीक जयंतीची कार्यकारीनी जाहीर.
[]अध्यक्षपदी राजकुमार खरात तर कार्यअध्यक्ष म्हणुन दिपक ठेंगे यांची निवड []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०८: मानवत शहरात प्रती वर्षा प्रमाने या ही वर्षी महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या संयुक्त जयंतीचे आयोजन मानवत शहरात करण्यात येनार आहे त्यासाठी त्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्ष म्हणुन लोकप्रिय नगरसेवक राजकुमार खरात तर कार्यध्यक्षपदी दिपक ठेंगे तर स्वागतध्यक्ष पदी सोमदत्त भदर्गे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मानवत येथील शासकीय विश्रामगृहात दि. ८ मार्च २०१८ रोजी सांयकाळी ७ वाजता माजी नगर सेवक बन्सीदादा भदर्गे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत महात्मा फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या सार्वजनिक जयंती च्या अध्यक्ष पदी लोकप्रिय नगर सेवक राजकुमार खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सार्वजनिक जयंती ची कार्यकारणी खालीलप्रमाणे घोषित करण्यात आली स्वागतअध्यक्षपदी सोमदत्त भदर्गे , सचिव पदी नितीन गवळी , कार्यध्यक्ष पदी दिपक ठेंगे , कोषाध्यक्षपदी जनार्धन किर्तने ,सहसचिवपदी रवि पंडीत , तर मुख्यसल्लागार पदी माजी नगरअध्यक्ष अमृत भदर्गे , नगरसेवक अनंत भदर्गे , आशोकदादा पंडीत ,तुळशीराम डाके , संपत पंडित , गजानन बारहाते ,धम्मपाल सोनटक्के , नारायण धबडगे , आशोक धापसे , महेद्र ठेंगे , सत्यशिल धबडगे ,सचिन रनखाब , संजय उजगरे , रामाभाऊ जोधळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .या बैठकीचे प्रस्ताविक चंद्रकांत मगर यांनी मांडले तर आभार बन्सीदादा भदर्गे यांनी मानले यावेळी शहरातील सर्व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.या निवडिचे शहरात सर्वच स्तरावर स्वागत होत असुन कार्यकारणीस शुभेच्छा मिळत आहे.
No comments:
Post a Comment